आयपीएल २०२४ च्या २२ व्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत मोठा बदल झाला आहे. या सामन्यापूर्वी युझवेंद्र चहलकडे पर्पल कॅप होती. पण चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजाने उत्कृष्ट कामगिरी करत युझी चहलकडून पर्पल कॅप हिसकावली आहे. मुस्तफिजूर रहमानकडे आता पर्पल कॅप आली आहे.
विशेष म्हणजे मुस्तफिजूर गेल्या दोन सामन्यांचा भाग नव्हता. पण सोमवारी (८ एप्रिल) केकेआरविरुद्धच्या सामन्यात २ बळी घेतले आणि पर्पल कॅप मिळवली.
म्हणजेच, मुस्तफिजुर रहमान पुन्हा एकदा पर्पल कॅपच्या शर्यतीत पुढे आला आहे. KKR विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, मुस्तफिजुर रहमानने ४ षटके टाकली आणि २२ धावा दिल्या. यादरम्यान त्याने श्रेयस अय्यर आणि मिचेल स्टार्कला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यासह त्याने आता या मोसमात ४ सामन्यात ९ विकेट घेतल्या आहेत. तर चहलने ४ सामन्यात ८ विकेट घेतल्या आहेत.
IPL २०२४ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
मुस्तफिजुर रहमान – ४ सामन्यात ९ विकेट्स
युझवेंद्र चहल – ४ सामन्यात ८ विकेट्स
खलील अहमद – 5 सामन्यात 7 विकेट्स
मोहित शर्मा - 5 सामन्यात 7 विकेट
जेराल्ड कोएत्झी – ४ सामन्यांत ७ विकेट्स
ऑरेंज कॅपवर विराटचा दबदबा - दुसरीकडे, ऑरेंज कॅप विराट कोहलीच्या डोक्यावर आहे. विराट कोहलीने ५ सामन्यात १०५.३३ च्या सरासरीने ३१६ धावा केल्या आहेत. यात त्याने २ अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे.
त्याचवेळी साई सुदर्शन दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने ५ सामन्यात १९१ धावा केल्या आहेत. रियान पराग १८५ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.