MS Dhoni IPL 2024 : आयपीएल २०२४ चा २९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज सायंकाळी दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. एमएस धोनीसाठी हा सामना खूप खास असणार आहे. या सामन्यादरम्यान तो एक मोठा विक्रम करू शकतो.
वास्तविक, महेंद्रसिंह धोनी अशा यादीत सामील होऊ शकतो, ज्यामध्ये आतापर्यंत फक्त सुरेश रैनाचे नाव आहे. एमएस धोनी २००८ पासून चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत आहे. तो सीएसकेसाठी आतापर्यंत २४९ सामने खेळला आहे. या कालावधीत त्याने ४९९६ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २३ अर्धशतकांचा समावेश आहे. तो आता CSK साठी ५००० धावा करण्यापासून फक्त ४ धावा दूर आहे. जर त्याने ५ हजार धावा पूर्ण केल्या तर सीएसकेसाठी अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू होईल.
याआधी सुरेश रैनाने हा पराक्रम केला होता. रैनाने सीएसकेसाठी ५५२९ धावा केल्या आहेत.
सुरेश रैना - ५५२९ धावा
एमएस धोनी – ४९९६ धावा
फाफ डू प्लेसिस - २९३२ धावा
मायकेल हसी - २२१३ धावा
मुरली विजय - २२०५ धावा
एमएस धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण २५५ सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने ३९.०९ च्या सरासरीने ५१२१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २४ अर्धशतकांचा समावेश आहे. एमएस धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
संबंधित बातम्या