MI vs CSK Dream 11 Prediction : आयपीएल २०२४ च्या २९व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज भिडणार आहेत. दोन्ही संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहे. सलग दोन सामन्यांत विजयाची चव चाखल्यानंतर हार्दिक पांड्याचा संघ चांगल्या लयीत आहे. तर, CSK ने गेल्या सामन्यात KKR ला एकतर्फी पराभूत केले होते.
दरम्यान, मुंबई असो की सीएसके, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
यष्टिरक्षक म्हणून इशान किशन हा सर्वोत्तम पर्याय असेल. गेल्या दोन सामन्यांमध्ये ईशानची बॅट जोरदार बोलली आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात इशानने अवघ्या ३४ चेंडूत ६९ धावांची तुफानी खेळी केली होती. इशान यष्टिरक्षक म्हणूनही तुम्हाला गुण मिळवून देऊ शकतो.
फलंदाजीत रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रचिन रवींद्र, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा हे चांगल्या लयीत आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांना खूप मदत करते. हेच कारण आहे की जास्तीत जास्त फलंदाजांना तुम्ही तुमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान द्यावे. या मोसमात रोहितची बॅट आतापर्यंत चांगलीच बोलली आहे. त्याचवेळी आरसीबीविरुद्ध सूर्यकुमारने १७ चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावले होते.
अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या हे सर्वोत्तम पर्याय असतील. जडेजाच्या फिरकीची जादू केकेआरविरुद्ध चांगलीच चालली होती. यासोबतच तो त्याच्या क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीने तुम्हाला बरेच गुण मिळवून देऊ शकतो. हार्दिकही गेल्या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता.
जसप्रीत बुमराह आणि मुस्तफिजुर रहमान तुम्हाला गोलंदाजीत सर्वाधिक गुण देऊ शकतात. बुमराहने गेल्या सामन्यात ५ विकेट घेतल्या होत्या, तर मुस्तफिझूरची कामगिरीही या हंगामात अप्रतिम राहिली आहे. बुमराहला तुम्ही कर्णधार किंवा उपकर्णधारही बनवू शकता.
यष्टिरक्षक- इशान किशन
फलंदाज - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रचिन रवींद्र, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड.
अष्टपैलू - रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या
गोलंदाज – जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मुस्तफिजुर रहमान