मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shubman Gill Century : शुभमनच्या शतकानं केएल राहुलचं टेन्शन वाढलं, आता संघात परतणं कठीण!

Shubman Gill Century : शुभमनच्या शतकानं केएल राहुलचं टेन्शन वाढलं, आता संघात परतणं कठीण!

Mar 11, 2023, 05:06 PM IST

    • shubman gill india vs australia test match : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटीत शुभमन गिलने शतक झळकावले आहे. टीम इंडियाच्या स्टार सलामीवीराचे हे दुसरे कसोटी शतक आहे, तसेच या कसोटी मालिकेतील भारतीय खेळाडूचे दुसरे शतक आहे. शुभमन आधी या मालिकेत रोहित शर्माने शतक केले होते.
shubman gill vs australia

shubman gill india vs australia test match : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटीत शुभमन गिलने शतक झळकावले आहे. टीम इंडियाच्या स्टार सलामीवीराचे हे दुसरे कसोटी शतक आहे, तसेच या कसोटी मालिकेतील भारतीय खेळाडूचे दुसरे शतक आहे. शुभमन आधी या मालिकेत रोहित शर्माने शतक केले होते.

    • shubman gill india vs australia test match : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटीत शुभमन गिलने शतक झळकावले आहे. टीम इंडियाच्या स्टार सलामीवीराचे हे दुसरे कसोटी शतक आहे, तसेच या कसोटी मालिकेतील भारतीय खेळाडूचे दुसरे शतक आहे. शुभमन आधी या मालिकेत रोहित शर्माने शतक केले होते.

shubman gill vs australia : अहमदाबाद येथे सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. पहिल्या डावात पाहुण्या संघाने ४८० धावा केल्या, प्रत्युत्तरात आता टीम इंडियाचा पहिला डाव सुरू आहे. भारताकडून शुभमन गिलने शतक झळकावले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

अहमदाबाद कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शुभमन गिलने आपले शतक पूर्ण केले, त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. इंदूर कसोटी गमावल्यानंतर अहमदाबाद कसोटीतही टीम इंडिया अडचणीत सापडली आहे, अशा परिस्थितीत शुभमन गिल भारताचा तारणहार ठरला आणि संघाची धुरा सांभाळली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला अहमदाबाद टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. शुभमन गिलने १९४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १० चौकार, १ षटकार आला.

गिल केएल राहुलच्या अडचणी वाढवणार?

२३ वर्षीय शुभमन गिलने काही वेळातच आपला ठसा उमटवला आहे. सलामीवीर म्हणून त्याने गेल्या एका वर्षात चांगलेच वर्चस्व गाजवले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शुभमन गिलने वनडे क्रिकेटमधील द्विशतकासह तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे. यामुळेच आता तो केएल राहुलसाठी टेन्शन वाढवत आहे.

आधी एकदिवसीय आणि T20 मध्ये शुभमन गिलला सलामीला ठेवण्यात आले होते आणि केएल राहुलला मधल्या फळीत हलवण्यात आले होते. मात्र, आता कसोटी क्रिकेटमधूनही केएल राहुलला वगळण्यात आले आणि शुभमन गिलला प्लेइंग-११ मध्ये आणण्यात आले. त्याचा परिणाम अहमदाबाद कसोटी सामन्यात दिसून आला.

एकीकडे शुभमन गिलने गेल्या दोन वर्षांत सलग शतके झळकावली आहेत, तर दुसरीकडे केएल राहुल सतत फ्लॉप झाला आहे. टी-२०, वनडेनंतर कसोटीतही त्याच्यावर टांगती तलवार आहे. प्रथम केएल राहुलकडून व्हाइट बॉल क्रिकेटचे उपकर्णधारपद हिरावून घेतले गेले, नंतर कसोटीचे उपकर्णधारपदही हिरावून घेण्यात आले.