मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shubman Gill : शुभमनच्या षटकारानंतर मजेशीर ड्रामा; पठ्ठ्यानं असा शोधून काढला चेंडू, पाहाच!

Shubman Gill : शुभमनच्या षटकारानंतर मजेशीर ड्रामा; पठ्ठ्यानं असा शोधून काढला चेंडू, पाहाच!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 10, 2023 06:07 PM IST

india vs australia 4th test shubman gill : अहमदाबाद कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवसाच्या अखेरीस एक विचित्र नाट्य पाहायला मिळाले. नॅथन लायनच्या चेंडूवर गिलने (shubman gill six ind vs aus) मिड-ऑनवर षटकार ठोकला. गिलच्या या शॉटमुळे चेंडू साइट स्क्रीनजवळील सीटच्या कोपऱ्यात अडकला. यानंतर बराच वेळ खेळ थांबला होता.

shubman gill six ind vs aus
shubman gill six ind vs aus

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या मालिकेत २-१ ने पुढे आहे. म्हणजेच जर भारतीय संघाने अहमदाबाद कसोटी सामना जिंकला तर ते मालिकादेखील जिंकतील.

शुभमन गिलच्या षटकारानंतर जोरदार ड्रामा

दरम्यान, या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटी जोरदार नाट्य घडले. ही संपूर्ण घटना भारतीय डावाच्या १०व्या षटकात आणि दिवसाच्या शेवटच्या षटकात घडली. त्या षटकात गिलने नॅथन लायनच्या दुसऱ्या चेंडूवर मिड-ऑनवर षटकार ठोकला. गिलचा शॉट इतका ताकदवान होता की बॉल साइट स्क्रीनजवळील सीटच्या कोपऱ्यात अडकला.

काही वेळ तेथे उपस्थित प्रेक्षकांनी चेंडू शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू न मिळाल्याने चौथे पंच चेंडूचा सेट घेऊन मैदानावर आले. परिणामी, मैदानावरील पंचांनी नवीन चेंडूने खेळ सुरू करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याचदरम्यान एका प्रेक्षकाला तो चेंडू मिळाला आणि तो चेंडू मैदानात फेकतो. त्यानंतर पंच त्याच जुन्या चेंडूने खेळ सुरू करण्याचा निर्णय घेतात. या संपूर्ण नाट्यामुळे बराच वेळ खेळ थांबला होता.

सामन्यात काय घडलं?

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने बिनबाद ३६ धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा १७ आणि शुभमन गिल १८ धावा करून नाबाद आहेत. पहिल्या डावाच्या आधारे भारत अजूनही ४४४ धावांनी मागे आहे.

याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या. उस्मान ख्वाजाने १८० आणि कॅमेरून ग्रीनने ११४ धावा केल्या. त्याचवेळी टॉड मर्फीने ४१ आणि नॅथन लायनने ३४ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारताकडून आर. अश्विनने पहिल्या डावात सर्वाधिक ६ बळी घेतले.

शुभमन गिलला पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळाले नाही, परंतु केएल राहुलच्या खराब फॉर्ममुळे गिलला इंदूर कसोटी सामना आणि या सामन्यात संधी मिळाली. आता गिल या संधीचा फायदा घेऊ इच्छितो.

WhatsApp channel