मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  WPL 2023 चा थरार रोमहर्षक वळणावर, ऑरेंज कॅप-पर्पल कॅप सध्या कोणाच्या डोक्यावर? जाणून घ्या

WPL 2023 चा थरार रोमहर्षक वळणावर, ऑरेंज कॅप-पर्पल कॅप सध्या कोणाच्या डोक्यावर? जाणून घ्या

Mar 10, 2023, 08:28 PMIST

orange cap & purple cap holder WPL 2023 : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या पराभवाची चव चाखायला लावली. मुंबईने दिल्लीचा ८ गडी राखून पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक केली. या सामन्यानंतर दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग आणि मुंबईची युवा खेळाडू सायका इशाक (Saika Ishaque purple cap) यांनी ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपवर कब्जा केला आहे.

  • orange cap & purple cap holder WPL 2023 : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या पराभवाची चव चाखायला लावली. मुंबईने दिल्लीचा ८ गडी राखून पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक केली. या सामन्यानंतर दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग आणि मुंबईची युवा खेळाडू सायका इशाक (Saika Ishaque purple cap) यांनी ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपवर कब्जा केला आहे.
दिल्ली कॅपिटल्सची (DC) कर्णधार मेग लॅनिंग आणि मुंबई इंडियन्सच्या (MI) सायका इशाक यांनी महिला प्रीमियर लीगमध्ये वर्चस्व राखले आहे. लॅनिंगने सर्वाधिक धावा आणि इशाकने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
(1 / 6)

लॅनिंगने मुंबईविरुद्ध ४१  चेंडूत ४३ धावा फटकावल्या. यासह तिने या लीगमधील ३ सामन्यात एकूण १८५ धावा केल्या आहेत. यादरम्यान लॅनिंगने २ अर्धशतके झळकावली आहेत. लॅनिंग हा महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. म्हणजे ऑरेंज कॅप सध्या मेग लॅनिंगच्या डोक्यावर आहे.
(2 / 6)

लॅनिंग आणि मुंबई इंडियन्सच्या हेली मॅथ्यूजमध्ये चुरशीची स्पर्धा सुरू आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मॅथ्यूज १५६ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 
(3 / 6)

मुंबईच्या सायका इशाकच्या डोक्यावर पर्पल कॅप आहे. लीगच्या पहिल्या दिवसापासून सायकाकडे ही कॅप आहे. तिने महिला प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंतच्या ३ सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत. तिने दोनदा एका सामन्यात ३ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
(4 / 6)

पर्पल कॅपच्या शर्यतीतदेखील हेली मॅथ्यूज दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने ३ सामन्यात ६ विकेट्स घेतल्या आहेत.
(5 / 6)

WPL 2023 orange cap & purple cap holder 
(6 / 6)
WPL 2023 orange cap & purple cap holder (photos- WPL 2023)

    शेअर करा