मराठी बातम्या  /  धर्म  /  Shree Ram Surya Tilak : अयोध्येतील ऐतिहासिक क्षणाचे घ्या दर्शन, या ९ शुभ योगात श्रीरामाचे झाले सूर्यटिळक

Shree Ram Surya Tilak : अयोध्येतील ऐतिहासिक क्षणाचे घ्या दर्शन, या ९ शुभ योगात श्रीरामाचे झाले सूर्यटिळक

Apr 17, 2024, 02:42 PM IST

  • Ayodhya Shree Ram Surya Tilak : आज संपूर्ण भारातात राम नवमीचा उत्साह साजरा केला जातोय. भगवान श्रीरामाचा जन्म कर्क राशीत दुपारी १२ वाजता झाला असं म्हणतात. या निमित्ताने अयोध्येत आज दुपारी १२ वाजता श्रीरामाला सूर्य टिळक करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे दर्शन घ्या.

अयोध्या श्रीराम सूर्यटिळक रामनवमी २०२४

Ayodhya Shree Ram Surya Tilak : आज संपूर्ण भारातात राम नवमीचा उत्साह साजरा केला जातोय. भगवान श्रीरामाचा जन्म कर्क राशीत दुपारी १२ वाजता झाला असं म्हणतात. या निमित्ताने अयोध्येत आज दुपारी १२ वाजता श्रीरामाला सूर्य टिळक करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे दर्शन घ्या.

  • Ayodhya Shree Ram Surya Tilak : आज संपूर्ण भारातात राम नवमीचा उत्साह साजरा केला जातोय. भगवान श्रीरामाचा जन्म कर्क राशीत दुपारी १२ वाजता झाला असं म्हणतात. या निमित्ताने अयोध्येत आज दुपारी १२ वाजता श्रीरामाला सूर्य टिळक करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे दर्शन घ्या.

आज बुधवार १७ एप्रिल रोजी रामनवमीच्या निमित्ताने रामाला सूर्य टिळक करण्यात आले. यावेळी केदार, गजकेसरी, पारिजात, अमला, शुभ, वाशी, सरल, कहल आणि रवियोग तयार झालेत. या ९ शुभ योगांमध्ये रामाच्या कपाळी सूर्य टिळक करण्यात आला.

ट्रेंडिंग न्यूज

Ganga Saptami 2024 : यंदा गंगा सप्तमी कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Varuthini Ekadashi 2024 : काय आहे वरुथिनी एकादशीचे महत्त्व? कशी मिळते पापातून मुक्ती? वाचा संपूर्ण कथा

Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व

Gemstones : तुमच्या राशीनुसार हे रत्न धारण करा, भाग्य उजळेल, आर्थिक भरभराट होईल, जाणून घ्या

आजच्या दिवशी अयोध्या येथील राम मंदिरात रामाच्या कपाळी 'सूर्य टिळक' करून ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला आहे. आरसे आणि लेन्सचा समावेश असलेल्या एका विस्तृत यंत्रणेमुळे देवतेचे हे 'सूर्य टिळक' शक्य झाले. मंगळवारी शास्त्रज्ञांनी या प्रणालीची चाचणी घेतली होती.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR)-केंद्रीय बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CBRI), रुडकीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञानुसार, नियोजित टिळक आकार ५८ मिमी आहे. कपाळ केंद्रावर टिळकाचा अचूक कालावधी सुमारे तीन ते साडेतीन मिनिटांचा होता, दोन मिनिटे पूर्ण रोषणाई होती, असे त्यांनी सांगितले.

रामाच्या सूर्य टिळकांनी अभिषेक केला जाणार असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील नलबारी येथील निवडणूक रॅलीत ऐतिहासिक प्रसंगाचा उल्लेख केला. ‘जय सियावर राम’ च्या जयघोषात पंतप्रधान म्हणाले, “आज रामनवमीचा ऐतिहासिक सोहळा आहे. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. सूर्य टिळक लावून त्यांचा जन्मसोहळा पवित्र नगरी अयोध्येत राम मंदिरात साजरा केला जाईल.”

प्राणप्रतिष्ठेच्या दिमाखदार सोहळ्यानंतर रामजन्मभूमी दुसऱ्यांदा भव्य सोहळ्याची साक्षीदार होत आहे. राम मंदिरात ५६ प्रकारचे भोग, प्रसाद आणि पंजिरी अर्पण करून रामनवमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे.

रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, उत्सवाची सर्व व्यवस्था ट्रस्टद्वारे व्यवस्थापित केली जात असून, रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

मुख्य पुजाऱ्यांनी पुढे माहिती दिली की, प्रभू रामाच्या मूर्तीला पिवळे कपडे घातले आणि त्यानंतर त्यांना पंचामृताने स्नान घालण्यात आले आहे. चार-पाच प्रकारच्या पंजिऱ्या बनवल्या गेल्या असून, त्यासोबतच ५६ प्रकारचा भोग देवाला लावला गेला आहे. 

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी यापूर्वी सूर्य टिळकांच्या वेळी सांगितले होते की, भाविकांना राम मंदिरात प्रवेश दिला जाईल. मंदिर ट्रस्टद्वारे सुमारे १०० आणि सरकारकडून ५० एलईडी स्क्रीन्स लावण्यात आले आहेत, यामुळे रामनवमीचा उत्सव सर्वांना पाहता येत आहे. लोक जिथे उपस्थित असतील तिथून उत्सव पाहू शकतील.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा