राम नवमीच्या दिवशी मठ आणि मंदिरांमध्ये यज्ञ आणि नर नारायण सेवा केली जाते.या दिवशी घरी पूजा आणि यज्ञ केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीही प्रसन्न होते. माता सीतेला लक्ष्मी स्वरूप मानले जाते. भगवान रामासोबत सीतेची उपासना केल्याने लक्ष्मीचा देवीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात ऐश्वर्य वाढते, असे सांगितले जाते.
विष्णू यांनी श्रीराम यांचा रुपात अभिजित मुहूर्त आणि कर्क राशीत दुपारी जन्म घेतला. रामनवमीच्या शुभ दिवशी, भक्त प्रार्थना, कथा आणि रामायणाच्या महाकाव्यात मग्न होतात आणि विशेष पूजा आणि आरत्या करतात . अनेक भागांमध्ये रामाच्या लहान मूर्ती धुवून (स्नान) करण्याची, त्यांना कपडे आणि दागिन्यांनी सजवण्याची आणि पाळणामध्ये ठेवण्याची परंपरा आहे. देशभरात रामनवमीचा हा उत्साह मोठ्या थाट्यामाट्या साजरा करण्यात येतो. जाणून घ्या यादिवशी कुठे काय कार्यक्रम आहे.
सर्वात मोठं आकर्षम म्हणजे अयोध्या येथील राम मंदिरात रामजन्म कसा होईल हे आहे. राम मंदिरातील रामजन्म सोहळा पाहण्यासाठी लाखो संख्येत भाविक अयोध्येला रवाना झाले आहेत. अयोध्येला आकर्षक सजावटही झाली आहे. तर दुपारी १२ वाजता रामलल्लाच्या मस्तकी होणारा सूर्यटिळक अर्थात सूर्य किरणांचा अभिषेक, यंदाच्या रामनवमीचं सगळ्यात मोठं आकर्षण असेल. साधारणपणे चार मिनिटं रामाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक होणार आहे.
झारखंडची राजधानी रांची राममय झाली आहे. महावीर ध्वजाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. सर्वत्र रामनवमीची जय्यत तयारी सुरू आहे. रांचीच्या मुख्य रस्त्यावर या बाबत प्रचंड उत्साह आहे. रामनवमीनिमित्त बाजारात विविध प्रकारचे झेंडे आले आहेत.
शिर्डी येथे श्रीराम नवमी निमित्त मोठा उत्साह असतो. शिर्डी साईबाबा संस्थानच्यावतीनं १६ ते १८ एप्रिल असा तीन दिवसीय श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाला शतकाची परंपरा असून, महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आदी राज्यांमधून मोठ्या संख्येने पालख्या शिर्डीत येतात.
मुंबई आणि पुण्यात राम नवमीच्या निमित्तानं विविध भागांमध्ये निघणाऱ्या सार्वजनिक यात्रा आणि मिरवणुका हे आकर्षणाचा विषय आहे. तसेच, भाविकांसाठी प्रसादाचे खास आयोजन करण्यात येते.
चैत्र शुद्ध नवमी १७ एप्रिल रोजी, सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत रामजन्मोत्सवाचे गुलालाचे कीर्तन होईल. दुपारी १२ वाजता प्रभु श्रीरामचंद्रांची महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत ब्रम्हवृंदांची वेदमंत्र सेवा होईल, तर रात्री ८ वाजता गीत रामायण सादर होणार आहे.
स्थळ - श्रीराम मंदिर संस्थान, रथ चौकाजवळ, जुने जळगाव.
जळगावातील इतर सर्व भागातील मंदिरातही दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल.
बुधवार १७ एप्रिल रोजी श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
वेळ-संध्या ५ वाजता, स्थळ- बालाजी राम मंदिर येथून.
इतरही सर्व मंदिरात तसेच संस्थेच्या वतीने शोभायात्रा, भजन-किर्तन, प्रवचन, रामरक्षास्तोत्र पठण असे विविध कार्यक्रम ठेवून रामजन्मोत्सव सोहळा साजरा केला जाईल.