Ram Navami 2024 Wishes : चैत्र शुद्ध नवमी हा दिवस आपण मोठ्या आनंदाने व उत्साहाने रामनवमी म्हणून साजरा करतो. यंदा बुधवार १७ एप्रिल २०२४ रोजी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येईल. ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री १२ वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी १२ वाजता झाला.
भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिरात भाविक आवर्जुन दर्शन घ्यायला जातील. रामनवमी सर्व राम मंदिरात मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जातो.रामनवमीच्या दिवशी, म्हणजेच १७ एप्रिलला तुम्ही रामाची पूजा सकाळी ११ वाजून १ मिनिटापासून ते दुपारी १ वाजून ३६ मिनिटांपर्यंत करू शकता. राम नवमीनिमित्त आपल्या आप्तस्वकीयांना हे खास शुभेच्छा पाठवून रामनवमीचा जल्लोष द्विगुणीत करा.
चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही,
वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
…
वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर
अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
…
तीर्थासि जातां बहु दुःख वाटे ।
विषयांतरी राहुनी सौख्य वाटे ।
स्वहीत माझें मजला कळेना
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा
…
मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
…
राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
…
दुर्जनांचा नाश करुन
कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित
करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
श्री रामनवमीच्या शुभेच्छा!
…
संसारसंगे बहु शीणलों मी ।
कृपा करी रे रघुराजस्वामी ।
प्रारब्ध माझे सहसा टळेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना
श्री रामनवमीच्या शुभेच्छा!
…
राम नाम ज्याचे मुखी
तो नर धन्य तिन्ही लोकि
श्री रामनवमीच्या शुभेच्छा
…
स्वये श्री रामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती
कुमार दोघे ऐक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
श्री रामनवमीच्या शुभेच्छा