मराठी बातम्या  /  धर्म  /  Ram Navami 2024 : राम नवमीला तुमच्या राशीनुसार करा या मंत्रांचा जप, मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल

Ram Navami 2024 : राम नवमीला तुमच्या राशीनुसार करा या मंत्रांचा जप, मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 14, 2024 08:20 PM IST

Ram Navami 2024 Upay : भगवान श्रीरामाची उपासना करणारे भक्त कष्टाळू, सदाचारी, क्षमाशील, दयाळू, धार्मिक आणि आदर्शवादी असतात, अशी धार्मिक धारणा आहे.

Ram Navami 2024 : राम नवमीला तुमच्या राशीनुसार करा या मंत्रांचा जप, मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल
Ram Navami 2024 : राम नवमीला तुमच्या राशीनुसार करा या मंत्रांचा जप, मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल (PTI)

दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. त्यानुसार यंदा १७ एप्रिलला रामनवमी आहे. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम प्रकट झाले होते. म्हणून भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. 

ट्रेंडिंग न्यूज

भगवान श्रीरामाची उपासना करणारे भक्त कष्टाळू, सदाचारी, क्षमाशील, दयाळू, धार्मिक आणि आदर्शवादी असतात, अशी धार्मिक धारणा आहे.

भगवान श्रीरामाच्या कृपेने साधकाच्या जीवनातील सर्व दु:ख, संकटे दूर होतात. जर तुम्हालाही मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर रामनवमीच्या दिवशी तुमच्या देवतेची यथासांग पूजा करा. तसेच पूजा करताना तुमच्या राशीनुसार मंत्रांचा जप करावा.

तुमच्या राशीनुसार या मंत्राचा जप करा

मेष- मेष राशीच्या लोकांनी रामनवमीला 'ओम परमात्मने नमः' या मंत्राचा जप करावा.

वृषभ- वृषभ राशीच्या लोकांनी भगवान श्री रामाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 'ओम परस्मै ब्रह्मणे नमः' या मंत्राचा जप करावा.

मिथुन- मिथुन राशीच्या लोकांनी रामनवमीला 'ओम यज्ञवने नमः' या मंत्राचा जप करावा.

कर्क - कर्क राशीच्या लोकांनी मनोकामना पूर्ण करण्यासाठी 'ओम पितवसे नमः' या मंत्राचा जप करावा.

सिंह - सिंह राशीच्या लोकांनी राम नवमीला 'ओम हरये नमः' या मंत्राचा जप करावा.

कन्या - कन्या राशीच्या लोकांनी भगवान श्री रामाला प्रसन्न करण्यासाठी 'ओम राम सेतुकृते नमः' या मंत्राचा जप करावा.

तूळ - तूळ राशीच्या लोकांनी राम नवमीच्या दिवशी 'ओम राघवाय नमः' या मंत्राचा जप करावा.

वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांनी पूजेच्या वेळी 'ओम आदिपुरुषाय नमः' या मंत्राचा जप करावा.

धनु - धनु राशीच्या लोकांनी राम नवमीला 'ओम पराय नमः' मंत्राचा जप करावा.

मकर- मकर राशीच्या लोकांनी इच्छित वर मिळविण्यासाठी 'ओम परगाय नमः' या मंत्राचा एक जप करावा.

कुंभ - कुंभ राशीच्या लोकांनी राम नवमीला 'ओम महोदराय नमः' या मंत्राचा जप करावा.

मीन- मीन राशीच्या लोकांनी भगवान श्री रामाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 'ओम ब्राह्मणाय नमः' मंत्राचा ५ वेळा जप करावा.

 

 

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग