Chaitra Navratri 2024 Kanya Pujan Vidhi : नवरात्रीमध्ये कन्या पूजेला खूप विशेष महत्त्व आहे. कारण मुली दुर्गा देवीच्या अवतारांचे प्रतिनिधित्व करतात. याशिवाय कन्येला माता लक्ष्मीचे रूपही मानले जाते. हा विधी सहसा अष्टमी आणि नवमी तिथीला केला जातो, परंतु काही लोक नवरात्रीच्या इतर दिवशीही कन्यापूजा करतात.
पौराणिक कथेनुसार, देवी दुर्गा कालसुराचा पराभव करण्यासाठी एका तरुण मुलीच्या रूपात अवतरली होती. त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्या पूजा करणे खूप शुभ मानले जाते.
कन्या पूजेला कंजक पूजा असेही म्हणतात. या वेळी ९ लहान मुलींना देवी दुर्गेचे ९ अवतार म्हणून पूजले जाते, ज्यांना नवदुर्गा म्हणूनही ओळखले जाते. चला तर मग जाणून घेऊया कन्या पूजेची पद्धत आणि त्याच्याशी संबंधित काही गोष्टी.
शास्त्रानुसार, कन्यापूजा करताना मुलींचे वय २ ते १० वर्ष असायला पाहिजे. कन्यापूजेत ९ मुलींचे असणे अत्यंत शुभ मानले जाते. कन्या पूजनात मुलींना सर्वप्रथम नवीन कपडे घालावे. त्यानंतर त्यांना स्वच्छ पाट्यावर बसवावे. यानंतर त्यांचे पाय धुऊन आणि त्यांच्या पायाला लाल रंग लावा. मग त्यांना टिळा लावावा.
यानंतर आपल्या क्षमतेनुसार मुलींना खाऊ घाला. ज्यामध्ये खीर, पुरी, आणि इतर प्रकारचे मिठाई त्यांना खायला द्या. जेवणानंतर मुलींना दक्षिणा म्हणून फळे आणि पैसा द्यावे आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. कन्येची पूजा केल्याने दुर्गामाता प्रसन्न होते आणि भक्तांचे सर्व दु:ख दूर करते, असे मानले जाते. शेवटी त्यांना काही अक्षत देऊन घरात शिंपडायला सांगा.
कन्या पूजा हा मुलींचा सन्मान आणि पूजा करण्याचा उत्तम मार्ग आहे. धार्मिक ग्रंथानुसार दोन ते दहा वयोगटातील मुली कुमारी पूजेसाठी योग्य आहेत. दोन ते दहा वर्षे वयोगटातील मुली माँ दुर्गेच्या विविध रूपांचे प्रतिनिधित्व करतात. कन्येची पूजा केल्याने दुर्गामाता प्रसन्न होते आणि भक्तांचे सर्व दु:ख दूर करते, असे मानले जाते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े