(6 / 6)यंदाच्या रामनवमीचं सगळ्यात मोठं आकर्षण असेल रामलल्लाच्या मस्तकी होणारा सूर्यतिलक अर्थात सूर्य किरणांचा अभिषेक. रामनवमीच्या दिवशी, मध्यान्ही, दुपारी १२ वाजता, साधारणपणे चार मिनिटं रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक होणार आहे. राम लल्लाच्या कपाळी होणारा हा गोलाकार सूर्याभिषेक ७५ एमएम व्यासाचा असेल. या अभिषेकासाठी गेले काही दिवस रुडकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च संस्थेचे वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेत होते. (PTI)