मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Padma : अवघ्या २० रुपयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरला पद्मश्री; कोण आहे हा देवदूत?

Padma : अवघ्या २० रुपयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरला पद्मश्री; कोण आहे हा देवदूत?

Jan 26, 2023, 03:41 PM IST

  • Padma Award Winner dr M C Dawar : मध्य प्रदेशातील डॉ. एम. सी. डावर यांना भारत सरकारनं 'पद्मश्री' देऊन गौरवलं आहे.

DR. M C Dawar

Padma Award Winner dr M C Dawar : मध्य प्रदेशातील डॉ. एम. सी. डावर यांना भारत सरकारनं 'पद्मश्री' देऊन गौरवलं आहे.

  • Padma Award Winner dr M C Dawar : मध्य प्रदेशातील डॉ. एम. सी. डावर यांना भारत सरकारनं 'पद्मश्री' देऊन गौरवलं आहे.

Who is dr M C Dawar : आपापल्या क्षेत्रात निष्ठेनं कार्यरत राहून समाजाची सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना भारत सरकारच्या वतीनं पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असतं. या निमित्तानं अशा महनीय व्यक्तींच्या कार्याची माहिती समाजासमोर येत असते व त्यातून इतरांनाही प्रेरणा मिळत असते. मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील ७७ वर्षीय डॉ. एम सी डावर यांचं कार्य देखील असंच प्रेरणादायी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sunita Williams : मागच्या वेळी नेली भगवदगीता; यावेळी सुनिता विलियम्स 'या' लकी देवतेची मूर्ती अंतराळात नेणार

Rahul Gandhi : राहुल गांधी सुपर पॉवर कमीशन आणून राम मंदिराचा निर्णय बदलणार!, माजी काँग्रेस नेत्याचा दावा

Vande Bharat: जे कधी झाले नाही ते आता होणार, वंदे भारतच्या माध्यमातून भारत चीनचे वाढवणार टेन्शन, ते कसे काय?

Pilgrims from Amravati died: महाराष्ट्रातील चार भाविक पंजाबमध्ये भीषण रस्ते अपघातात ठार

डॉ. डावर यांना भारत सरकारनं यंदा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. सरकारच्या या घोषणेनंतर डावर यांच्या कार्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. डॉ. डावर यांचा जन्म १६ जानेवारी १९४६ रोजी पाकिस्तानातील पंजाब प्रांतात झाला. फाळणीनंतर ते भारतात आले. जबलपूर येथून १९६७ साली त्यांनी एमबीबीएस (बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी) पूर्ण केलं. १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धादरम्यान त्यांनी सुमारे एक वर्ष भारतीय सैन्यात काम केलं. त्यानंतर १९७२ पासून जबलपूरमधील सर्वसामान्य लोकांना अत्यंत नाममात्र शुल्कात आरोग्य सेवा देण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्यांचा हा सेवा यज्ञ आजही सुरू आहे. सुरुवातीला त्यांनी अवघ्या २ रुपयांत लोकांवर उपचार सुरू केले. आज ५० वर्षांनंतर त्यांची फी अवघी २० रुपये आहे.

‘कठोर परिश्रमांचं फळ उशिरा का होईना, पण नक्की मिळतं. मला मिळालेला पद्मश्री हा देखील असंच फळ आहे. लोकांच्या आशीर्वादामुळं मला हा पुरस्कार मिळाला आहे, अशी भावना त्यांनी 'एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली.

डॉ. डावर म्हणतात…

'रुग्णांकडून इतकी कमी फी घेण्यावरून आमच्या घरात चर्चा नक्कीच झाली होती, पण त्यावरून मतभेद नव्हते. आमचा उद्देश केवळ जनतेची सेवा हा होता, त्यामुळं फी वाढवली नाही. चिकाटीनं व संयमानं काम करत राहणं हाच यशाचा मूलमंत्र आहे. हा मंत्र अनुसरला तर यश नक्कीच मिळतं आणि त्या यशाचाही आदर केला जातो, असं डॉ. डावर सांगतात.

डॉ डावर यांचा मुलगा ऋषी यानंही या पुरस्काराच्या निमित्तानं आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. 'सरकारी पुरस्कार हे केवळ राजकीय संबंधांमुळं दिले जातात असं आम्हाला वाटायचं. मात्र, सरकार ज्या पद्धतीनं तळागाळात काम करणाऱ्या लोकांना शोधून त्यांचा सन्मान करत आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळंच माझ्या वडिलांना हा पुरस्कार मिळाला आहे, असं ऋषी म्हणाला. 

‘आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी आणि आमच्या शहरासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे,’ असं डॉ. डावर यांची सून सुचिता म्हणाली.

विभाग