मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Padma Vibhushan: १९७१ च्या युद्धात ORS ने वाचवले लाखोंचे प्राण, कोण आहेत डॉ. दिलीप महालनोबिस?

Padma Vibhushan: १९७१ च्या युद्धात ORS ने वाचवले लाखोंचे प्राण, कोण आहेत डॉ. दिलीप महालनोबिस?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 26, 2023 12:26 AM IST

Drdilipmahalanabis : डॉ दिलीप महालनोबिस यांना यंदाचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. जाणून घेऊया त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील व सामाजिक कार्याबद्दल..

डॉ. दिलीप  महालनोबिस
डॉ. दिलीप  महालनोबिस

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी ओआरएसवर काम करणारे डॉ. दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण देऊन गौरविण्यात आले आहे. हा' भारतरत्न नंतरचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ओआरएस ही भारताने जगाला दिलेली भेट असल्याचे सांगत सरकारने त्यांचा गौरव केला आहे. या उपायामुळे जगभरात पाच कोटी लोकांचे प्राण वाचले आहेत. साधे, कमी किमतीचे आणि प्रभावी असल्याने, जगभरात अतिसार, कॉलरा आणि डी-हायड्रेशनमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ९३ टक्के घट नोंदवली गेली.

डॉ. दिलीप महालनोबिस यांचे गेल्यावर्षी १६ ऑक्टोबर रोजी कोलकाता येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग आणि वयाशी संबंधित इतर आजारांनी ग्रासले होते. ORS ची किंमत खूपच कमी असल्याने करोडो लोक त्याचा वापर करतात. १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धा  दरम्यान, डॉ. महालनोबिस निर्वासित शिबिरांमध्ये काम करत असताना त्यांनी ओआरएसच्या क्षेत्रात खूप काम केले आणि प्राण वाचवले. २० व्या शतकातील सर्वात महत्त्वाचा वैद्यकीय शोध म्हणून द लॅन्सेटने याचे वर्णन केले आहे. १९७५ ते १९७९ पर्यंत, डॉ. महालनोबिस यांनी अफगाणिस्तान, इजिप्त आणि येमेनमध्ये डब्ल्यूएचओसाठी कॉलरा नियंत्रित करण्यासाठी काम केले. १९८० च्या दशकात, त्यांनी जिवाणूजन्य रोगांच्या व्यवस्थापनावरील संशोधनावर WHO सल्लागार म्हणून काम केले.

 

डॉ. दिलीप यांना २००२ मध्ये पॉलिन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. नॅथॅनियल एफ पियर्स यांच्यासह डॉ. दिलीप महालनोबिस यांना कोलंबिया विद्यापीठाने पॉलिन पुरस्कार प्रदान केला होता. बालरोग शास्त्रातील नोबेलच्या बरोबरीचा हा सन्मान मानला जातो. १२ नोव्हेंबर १९३४ रोजी पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या डॉ. महालानाबिस यांनी कोलकाता आणि लंडनमध्ये शिक्षण घेतले आणि १९६० च्या दशकात कोलकाता येथील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल सेंटर फॉर मेडिकल रिसर्च अँड ट्रेनिंग मध्ये सामील झाले, जिथे त्यांनी ओरल डीहायड्रेशन थेरपी मध्ये संशोधन केले. त्याचवेळी, जेव्हा १९७१ चे युद्ध सुरू झाले तेव्हा तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील लाखो लोकांनी भारतात आश्रय घेतला. या निर्वासित छावण्यांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वच्छतेच्या समस्या होत्या आणि लोकांमध्ये कॉलरा आणि अतिसाराचा प्रादुर्भाव झाला.

ORS सोल्यूशनने युद्धात जीव वाचवला.
डॉ. महालनोबिस आणि त्यांची टीम बनगावमधील अशाच एका शिबिरात काम करत होती. साखर आणि मिठाचा उपाय लाखो जीव वाचवू शकतो हे डॉ. महालनाबिस यांना माहीत होते. त्यांनी आणि त्यांच्या टीमने नंतर पाण्यात मीठ आणि ग्लुकोजचे द्रावण तयार केले आणि ते मोठ्या ड्रममध्ये साठवण्यास सुरुवात केली जिथून रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक स्वत: ला मदत करूशकतील. डॉ. महालनाबिस यांनी नंतर त्या कालावधीबद्दल १९७१ मध्ये WHOच्या साउथ-ईस्टएशिया जर्नल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये लिहिले, कॉलराच्या उपचारासाठी उपलब्ध संसाधने एकत्रित करण्यात आली होती. परंतु मूलभूत अडथळे अजूनहीअस्तित्वात आहेत. आम्ही या परिस्थितीत एकमेव आधार म्हणून तोंडी द्रव वापरण्याची सूचना केली.

IPL_Entry_Point

विभाग