मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Padma award 2023 : मुलायमसिंह, महालनोबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण, परशुराम खुणे यांना पद्मश्री

Padma award 2023 : मुलायमसिंह, महालनोबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण, परशुराम खुणे यांना पद्मश्री

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 25, 2023 10:25 PM IST

Padma award 2023 : केंद्र सरकारने आज पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. सहा पद्मविभूषण, ९ पद्मभूषण व ९१ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

Padma award 2023
Padma award 2023

Padma Awards 2023 : दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पद्मपुरस्कार -पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. भारताचे माजी संरक्षणमंत्री व यूपीचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायमसिंह यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुलायमसिंह यादव यांचे दीर्घ आजाराने १० ऑक्टोबर २०२२ रोजी निधन झाले होते. त्यांच्याबरोबर ORS चे प्रमुख दिलीप महालनोबिस यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. पद्मविभूषण भारतरत्ननंतर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांच्यासह १०६ जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.परशुराम खोणे हे झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार असून त्यांनी आतापर्यंत800 हून अधिक नाटकांमध्ये काम केलं आहे. परशुराम खुणे यांनी अनेक नक्षलवादी तरुणांना हिंसा सोडून मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं आहे.

 

केंद्र सरकारने आज पद्म पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये सहा पद्मविभूषण, नऊ पद्मभूषण आणि ९१ जणांना पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. ओआरएसचे निर्माता दिलीप महालनोबिस आणि मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

ज्या ६ व्यक्तींना द्मविभूषण प्रदान करण्यात आला आहे. त्यात बाळकृष्ण दोशी (मरणोत्तर), एसएम कृष्णा, दिलीप महालानोबिस (मरणोत्तर), श्रीनिवास वर्धन आणि मुलायम सिंह यादव (मरणोत्तर) यांच्या नावांचा समावेशआहे. हे पुरस्कार भारताचे राष्ट्रपती दरवर्षी मार्च/एप्रिलच्या आसपास राष्ट्रपतीभवनात होणाऱ्या औपचारिक समारंभात प्रदान केले जातात.

वर्ष २०२३ साठी राष्ट्रपतींनी १०६ पद्मपुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. या यादीत ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांपैकी १९ महिला आहेत आणि या यादीमध्ये परदेशी / एनआरआय/ पीआयओ/ ओसीआय या श्रेणीतील  २ व्यक्ती आणि ७ मरणोत्तर पुरस्कारप्राप्त व्यक्तींचाही समावेश आहे.

IPL_Entry_Point