मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vande Bharat: जे कधी झाले नाही ते आता होणार, वंदे भारतच्या माध्यमातून भारत चीनचे वाढवणार टेन्शन, ते कसे काय?

Vande Bharat: जे कधी झाले नाही ते आता होणार, वंदे भारतच्या माध्यमातून भारत चीनचे वाढवणार टेन्शन, ते कसे काय?

May 06, 2024, 06:40 PM IST

  • Sikkim Vande Bharat : सिक्किममध्ये वंदे भारत सुरु झाल्यास यामुळे ईशान्य भारतात कनेक्टिव्हिटी वाढवण्यास मदत होईल. यामुळे सेमी हाय-स्पीड ट्रेन सेवा सिक्किमला भारतीय रेल्वे नेटवर्कशी पुन्हा जोडली जाईल.

सिक्किममध्येही धावणार वंदे भारत

Sikkim Vande Bharat : सिक्किममध्ये वंदे भारत सुरु झाल्यास यामुळे ईशान्य भारतात कनेक्टिव्हिटी वाढवण्यास मदत होईल. यामुळे सेमी हाय-स्पीड ट्रेन सेवा सिक्किमला भारतीय रेल्वे नेटवर्कशी पुन्हा जोडली जाईल.

  • Sikkim Vande Bharat : सिक्किममध्ये वंदे भारत सुरु झाल्यास यामुळे ईशान्य भारतात कनेक्टिव्हिटी वाढवण्यास मदत होईल. यामुळे सेमी हाय-स्पीड ट्रेन सेवा सिक्किमला भारतीय रेल्वे नेटवर्कशी पुन्हा जोडली जाईल.

Sikkim vande bharat : देशभरातील अनेक राज्यात धावणारी वंदे भारत ट्रेन आता सिक्किममध्येही सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. तसे झाल्यास रेल्वेच्या क्षेत्रात मोठा क्रांतीकारी बदल होईल. सिक्किममध्ये वंदे भारत सुरु झाल्यास यामुळे ईशान्य भारतात कनेक्टिव्हिटी वाढवण्यास मदत होईल. यामुळे सेमी हाय-स्पीड ट्रेन सेवा सिक्किमला भारतीय रेल्वे नेटवर्कशी पुन्हा जोडली जाईल. 

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

मागच्या वर्षी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले होते की, डिसेंबर २०२४ पर्यंत सिक्किमला उर्वरित भारताशी जोडण्यासाठी सेमी-हाय-स्पीड वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याची योजना आहे. सिक्किममध्ये आपल्या दौऱ्यावेळी वैष्णव यांनी ४५ किमी लांब सेवोके-रंगपो रेल्वे प्रकल्पाच्या कामाचे निरीक्षण केले आहे.

केव्हापर्यंत सिक्किममध्ये धावणार वंदे भारत -
वैष्णव यांनी म्हटले होते की, सिक्किममधील वंदे भारत रेल्वे मार्गात १४ बोगदे वव १७ पूल असतील. सहा बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे व अन्य पुलांचे निर्माणकार्य सुरू आहे. पंतप्रधान सिक्किमला भारतीय रेल्वेच्या मानचित्रावर आणण्यासाठी इच्छुक आहेत. यावेळी रंगपो रेल्वेशी जोडला जाणार आहे. त्यानंतर रंगपो आणि गंगटोक दरम्यान रेल्वेचा विस्तार होणार आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत वंदे भारत ट्रेन सिक्कमध्ये धावेल. 

वंदे भारतच्या माध्यमातून चीनला टेन्शन देण्याचे नियोजन –

द टेलीग्राफच्या रिपोर्टमध्ये नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेच्या सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, केंद्र सरकार भारत-चीन सीमेवरील नाथू-ला पर्यंत रेल लिंक बनवणार आहे. सेवोके-रंगपो विभागात यावर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत रेल्वे धावणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिक्किम भौगोलिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेश आणि लडाखप्रमाणे या राज्यातील रेल्वे कनेक्टिविटी सुधारण्यावर सरकारचा भर आहे. एका अन्य रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, जर सिक्किममध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर ५ तासात गुवाहाटीला पोहोचणे शक्य आहे. जे येथील लोकांसाठी गेम-चेंजर ठरेल.

मुंबई -अहमदाबाद ट्रेनचे स्पीड वाढणार -

मुंबई आणि अहमदाबाद (Mumbai Ahmedabad corridor) दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी खुशखबर आहे. पश्चिम रेल्वेच्या या मार्गावर वेगवान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे (Vande bharat express train) ट्रायल केले जात आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त (CRS)कडून हिरवा झेंडा दाखवला आहे. वंदे भारत ट्रेन्स आपली गती व चांगल्या सुविधांसाठी ओळखली जाते. सध्या या ट्रेनची गती १३० किमी प्रति तास आहे, ती वाढवून १६० किलोमीटर प्रति तास करण्याची तयारी आहे. जर ही ट्रायल यशस्वी झाली तर प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. मुंबई आणि अहमदाबाद मार्गावरील प्रवासात जवळपास ४५ मिनिटांची बचत होणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी जवळपास ५ तास २५ मिनिटांचा वेळ लागतो.

पुढील बातम्या