Vande Bharat Sleeper: वंदे भारत ट्रेन लाँचिंगपासून प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये अन्य एक्सप्रेस-मेल रेल्वेच्या तुलनेत अधिक सुविधा असल्याने लोक याला पसंती देतात. देशभरात यशस्वी झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने वंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर कोच विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच देशात स्लीपर वंदे भारत धावणार आहेत.
कसे असेल वंदे भारत स्लीपरचे डिझाइन -
आतापर्यंत वंदे भारत ट्रेनमध्ये केवळ सिंगल-सीटर कोच बनवण्यात आले आहेत. आता भारतीय रेल्वे स्लीपर सुविधा असणारे वंदे भारत ट्रेन कोच तयार करत आहे. या कोचमुळे निश्चितपणे भारतीय रेल्वे उद्योगात एक मोठा बदल होण्याची आशा आहे. नव्या वंदे भारत स्लीपर कंपार्टमेंट ट्रेनच्या डिझाइनबाबत काही माहिती समोर आली आहे. या ट्रेनच्या पुढच्या भागाचे डिझाईन गरुडासारखे दिसणारे असेल.
वंदे भारत स्लीपरमध्ये असतील १६ कोच -
ट्रेनमध्ये एकूण १६ कोच असतील तसेच यामध्ये एकूण तीन प्रकारच्या कोचचा समावेश असेल. त्यामध्ये- ३ टियर एसी, २ टियर एसी आणि फर्स्ट क्लास एसी. एकूण १६ कोचमध्ये ११ ३ टियर एसी कोच, चार २ टियर एसी कोच आणि एक फर्स्ट क्लास एसी कोचचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये एकूण ८२३ प्रवासी प्रवास करू शकतात. त्यामध्ये ६११ प्रवासी ३-टियर एसी कोचमध्ये, १८८ प्रवासी २-टियर एसी कोचमधून आणि २४ प्रवासी प्रथम श्रेणी कोचमधून प्रवास करू शकतात.
कसे असेल वंदे भारत स्लीपर ट्रेनचे इंटीरियर -
या ट्रेनच्या इंटीरियरला क्रीम, पिवळ्या व लाकडाच्या रंगात आकर्षक लुक देण्यात आला आहे. मिडिल आणि अप्पर बर्थसाठी शिडीची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे प्रवासी वरच्या बर्थवर आरामात चढू शकतात. या ट्रेनमध्ये सर्व लाइट सेंसर लाइट आहेत. जेव्हा प्रवासी संबंधित क्षेत्रात जातील तेव्हा लाईट आपोआप लागतील. जेव्हा प्रवासी नसतील तेव्हा विजेची बचत करण्यासाठी लाईट बंद केली जातील. रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी आवश्यक ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रात्री जेव्हा प्रवासी बोगीतून चालत असेल तेव्हा उजेडासाठी खाली लावलेली एलईडी लाइट स्ट्रिप्स लागेल. प्रवासी त्या क्षेत्रात गेल्यासच हे लाईट काम करतील. ही लाईट झोपेत असलेल्या अन्य प्रवाशांना डिर्स्टब करणार नाही.
वंदे भारत स्लीपरमध्ये बायो टॉयलेटची सुविधा -
ट्रेनच्या आतमध्ये एका बोगीतून दुसऱ्या बोगीत जाणाऱ्या दरवाजात व शौचालय क्षेत्रात सर्व दरवाजे ऑटोमेटिक असतील. हे सेंसरवर काम करतील. यामुळे ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारचा आवाज येणार नाही. या ट्रेनमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष शौचालयाची सुविधा आहे. इतकेच नाही सध्याच्या वंदे भारत ट्रेनप्रमाणे ट्रेनममध्ये चढणाऱ्या प्रवाशांसाठी ऑटोमेटिक दरवाजे लावले आहेत. यामध्ये विमानाप्रमाणे बायो टॉयलेट सिस्टीम दिली आहे. याला असे डिजाइन केले आहे, जेणेकरून याचा दुर्गंध येणार नाही.
वंदे भारत स्लीपरची गती किती असेल -
या ट्रेनच्या शौचालयाच्या आत सर्व वॉश बेसिन अशा प्रकारे डिझाइन केले आहे, की पाणी खाली पडणार नाहीत. प्रथम श्रेणी एसी बोगीत शौचालयात स्नान करण्यासाठी शॉवर आणि गरम पाण्याची सोय असेल. ही ट्रेन ताशी १८० किलोमीटर गतीने धावू शकते. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे ही ट्रेन १६० किलोमीटर प्रति तास गतीने धावेल.