मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खुशखबर.. भारताबरोबरच आता परदेशातही धावणार Vande Bharat, काय आहे प्रकार?

खुशखबर.. भारताबरोबरच आता परदेशातही धावणार Vande Bharat, काय आहे प्रकार?

Feb 26, 2024 09:14 PM IST

Vande Bharat News : अश्विनी वैष्णवयांनी सांगितले की, लवकरचवंदे भारत एक्सप्रेसचेनिर्यातकेले जाणार असून याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Vande Bharat News
Vande Bharat News

Vande Bharat News: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ट्रेनबाबत मोठी घोषणा केली आहे. भारतानंतर वंदे भारत परदेशात धावण्यासाठी तयार होत आहे.  अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, लवकरच वंदे भारत एक्सप्रेसचे निर्यात केले जाणार असून याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनेक देशांनी याबाबत रुच दाखवली आहे. रेल्वे मंत्रालय २०२५-२६ पर्यंत वंदे भारत ट्रेनचे निर्यात सुरू करण्यासाठी एक रोडमॅप तयार करत आहे. वंदे भारत ट्रेनचे उत्पादन वाढवण्यासाठी काम केले जात आहे.

यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी २६ फेब्रुवारी रोजी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून ४१,००० कोटी रुपयांहून अधिक जवळपास २००० रेल्वे पायाभूत परियोजनांचे भूमिपूजन केले. ५०० रेल्वे स्टेशन आणि १५००० अन्य स्थानांवरून लाखो लोक विकसित भारत विकसित रेल्वे कार्यक्रमाशी जोडले आहेत.

रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय रेल्वे आपल्या प्रमुख वंदे भारत इंजिनाच्या निर्यातीवर विचार करत आहे. यासाठी ऑफर मिळत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकी स्टेट चिलीने वंदे भारतसाठी मागणी केली आहे. अजूनपर्यंत ऑर्डर मिळाली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारानुसार वंदे भारतच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात येतील. 

भारत प्रमुख वंदे भारत इंजिनांचे निर्यात करणार असून अनेक देशांनी रुची दाखवली असली तरी अजूनपर्यंत ऑर्डर दिलेली नाही. लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकन देशांनी रुची दाखवली आहे. विशेषरित्या इलेक्ट्रिक इंजिनांची मागणी होत आहे. १६ कोच असणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या निर्माणाचा खर्च जवळपास १३० कोटी रुपये आहे.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर