मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vande Bharat: स्लीपर ‘वंदे भारत’ बाबत मोठी अपडेट, वाचून तुम्हालाही आनंद होईल!

Vande Bharat: स्लीपर ‘वंदे भारत’ बाबत मोठी अपडेट, वाचून तुम्हालाही आनंद होईल!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 03, 2024 11:31 PM IST

Vande Bharat Express Train : रायबरेलीतील एमसीएफशिवाय,कपूरथला रेल्वे कोच फॅक्ट्री,चेन्नई येथील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत वंदे भारत ट्रेनसाठी नवीन कोच तयार करण्याचे काम सुरू आहे.

Vande Bharat
Vande Bharat

Vande Bharat: वंदे भारतच्या यशानंतर भारतीय रेल्वे स्लीपर वंदे भारत ट्रेन्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. याबाबत मोठी गुड न्यूज समोर आली आहे. यूपीमधील रायबरेली येथील मॉडर्न कोच फॅक्ट्री (MCF) ने ८ नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन स्लीपर कोचसह तयार केल्या आहेत. या ट्रेनमध्ये ११ कोच असतील, त्यामध्ये ११ एसी ३ टायर, चार एसी २ टायर आणि एक एसी फर्स्ट क्लास बोगी असतील. दरम्यान  ट्रेनमध्ये स्लीपर कोच २० ते २४ पर्यंत वाढवले जाणार आहेत.

रायबरेलीतील एमसीएफशिवाय, कपूरथला रेल्वे कोच फॅक्ट्री, चेन्नई येथील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत वंदे भारत ट्रेनसाठी नवीन कोच तयार करण्याचे काम सुरू आहे. रेल्वेचे चीफ पीआरओ आरएन तिवारी यांनी म्हटले की, पहिल्या टप्प्यात आम्ही स्लीपर वंदे भारत ट्रेनचे दोन रेक रोल आउट करेन त्यानंतर अन्य लाँच केले जातील. स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस रेकशिवाय, एमसीएफला वर्ष २०२४ मध्ये एसी आणि नॉन एसी कोच कॉन्फ़िगरेशनसह पुश-एंड-पुल ट्रेन रेकचे निर्माण कार्य सुरू केले जाईल.

यंदाच्या बजेटमध्ये वंदे भारतचा उल्लेख –

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना वंदे भारतबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, ४० हजार सामान्य रेल्वे बोगींना वंदे भारत मानकांप्रमाणे बदलले जाईल. तसेच तीन प्रमुख रेल्वे इकॉनॉमिक्स कॅरिडोर कार्यान्वित केले जातील. अर्थमंत्र्यांनी लोकसभेत २०२४-२५ चे अंतरिम बजेट सादर करताना तीन प्रमुख आर्थिक रेल्वे कॅरिडॉर कार्यक्रम कार्यान्वित करण्याची घोषणा केली.

WhatsApp channel

विभाग