मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Padma awards 2023: झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण तर रवीना टंडन आणि एमएम कीरवानी पद्मश्रीने सन्मानित

Padma awards 2023: झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण तर रवीना टंडन आणि एमएम कीरवानी पद्मश्रीने सन्मानित

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 26, 2023 12:49 AM IST

Padmaawards 2023 : प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण तर बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन व दाक्षिणात्य चित्रपटासृष्टीतील संगीतकार व कीरवानी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

Padma awards
Padma awards

७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पद्म पुरस्कारांची नावे जाहीर केली आहेत. यावर्षी एकूण १०६ जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.  यातील सहा विभूतींना  पद्मविभूषण, नऊ जणांना पद्मभूषण आणि ९१ जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. भारताचे प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे. दुसरीकडे, बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि 'RRR' मधील 'नाटू-नाटू' गाण्याचे  संगीतकार  एमएम  कीरवानी यांना पद्मश्री देण्यात येणार आहे.

झाकीर हुसेन
झाकीर हुसेन हे तबला वादक तसेच संगीतकार आणि तालवादक आहेत. उस्ताद यांना त्यांच्या अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनुक्रमे १९८८ आणि २०२२ मध्ये पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

रवीना टंडन
बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन भारतीय चित्रपटसृष्टीतील तिच्या उल्लेखनीय योगदानासाठी ओळखली जाते. या अभिनेत्रीने आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून हिंदी चित्रपटसृष्टीला नव्या उंचीवर नेले आहे. रवीना टंडन देखील एक पर्यावरणवादी आहे आणि ती २००२ पासून PETA मध्ये काम करत आहे.

एमएम कीरवाणी
एमएम कीरवाणी यांनी 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' हे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला आहे आणि 'ऑस्कर २०२३' साठी नामांकन मिळाले आहे. याआधी एमएम कीरवानी यांनी 'गली में आज चांद निकला', 'जादू है नशा है', 'आ भी जा आ  भी जा'  अशी  अनेक प्रसिद्ध गाणी संगीतबद्ध केली आहेत.  विशेष म्हणजे कीरवाणी  हे दक्षिणेतील  प्रसिद्ध दिग्दर्शक राजामौली यांचे चुलत भाऊ आहेत. 

IPL_Entry_Point