मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pilgrims from Amravati died: महाराष्ट्रातील चार भाविक पंजाबमध्ये भीषण रस्ते अपघातात ठार

Pilgrims from Amravati died: महाराष्ट्रातील चार भाविक पंजाबमध्ये भीषण रस्ते अपघातात ठार

May 06, 2024, 06:00 PM IST

  • महाराष्ट्रातील अमरावती येथील एक कुटुंब वैष्णोदेवी मंदिरातून परतत असताना पंजाबमधील जालंधर-पठाणकोट महामार्गावर झालेल्या चार जण ठार झाले.

The car in which the family was travelling after it met with the accident at Raipur Rasoolpur village on the Jalandhar-Pathankot highway on Monday. (HT Photo)

महाराष्ट्रातील अमरावती येथील एक कुटुंब वैष्णोदेवी मंदिरातून परतत असताना पंजाबमधील जालंधर-पठाणकोट महामार्गावर झालेल्या चार जण ठार झाले.

  • महाराष्ट्रातील अमरावती येथील एक कुटुंब वैष्णोदेवी मंदिरातून परतत असताना पंजाबमधील जालंधर-पठाणकोट महामार्गावर झालेल्या चार जण ठार झाले.

पंजाबमधील जालंधर-पठाणकोट महामार्गावर सोमवारी झालेल्या भीषण अपघातात अमरावती येथील चार भाविक ठार झाल्याचे वृत्त आहे. यात ११ महिन्यांच्या मुलीचा समावेश आहे. जम्मूजवळील कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेऊन हे कुटुंब परतत होते. परतीच्या मार्गावर पंजाबमधील जालंधर जिल्ह्याच रायपूर-रोसूलपूर गावात पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला.

ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

या अपघाताबाबत अधिक माहिती देताना पंजाब पोलिस दलाचे अधिकारी केवल सिंह म्हणाले, ‘ह्युंदाई आय १० या कारने हे सर्व भाविक प्रवास करत होते. प्रवासादरम्यान कार नियंत्रणाबाहेर गेली आणि ती समोरून येणाऱ्या टोयोटा इनोव्हा कारला जाऊन धडकली. त्यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. कारची धडक एवढी जोरदार होती की धडकेत कार पूर्णपणे चेंदामेंदा झाली.’ मृतांमध्ये गानू राम लाल (वय ५९), त्यांचा मुलगा लोकेश्वर (वय ३३), त्यांची पत्नी अनीषा (वय २६) आणि त्यांची ११ महिन्यांची मुलगी निहारिका यांचा समावेश आहे. स्थानिक रहिवाशांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. परंतु यातील चौघांना मृत घोषित करण्यात आले. या अपघातात इनोव्हा कारमध्ये प्रवास करणारे दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सविस्तर वृत्त लवकरच…

 

 

विभाग

पुढील बातम्या