मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : राहुल गांधी सुपर पॉवर कमीशन आणून राम मंदिराचा निर्णय बदलणार!, माजी काँग्रेस नेत्याचा दावा

Rahul Gandhi : राहुल गांधी सुपर पॉवर कमीशन आणून राम मंदिराचा निर्णय बदलणार!, माजी काँग्रेस नेत्याचा दावा

May 06, 2024, 07:18 PM IST

  • Rahul Gandhi On Ram Mandir :काँग्रेस सत्तेत आल्यानंतर सुपरपावर कमीशन तयार करून या निकालाला शाह बानो प्रकरणाप्रमाणे बदलले जाईल.असा दावा माजी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे.

राहुल गांधी सुपर पॉवर कमीशन आणून राम मंदिराचा निर्णय बदलणार!

Rahul Gandhi On Ram Mandir :काँग्रेस सत्तेत आल्यानंतर सुपरपावर कमीशन तयार करून या निकालाला शाह बानो प्रकरणाप्रमाणे बदलले जाईल.असा दावा माजी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे.

  • Rahul Gandhi On Ram Mandir :काँग्रेस सत्तेत आल्यानंतर सुपरपावर कमीशन तयार करून या निकालाला शाह बानो प्रकरणाप्रमाणे बदलले जाईल.असा दावा माजी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे.

काँग्रेसमधून निलंबित नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सोमवारी दावा केला की, सुप्रीम कोर्टात राम मंदिर जन्मभूमी आणि बाबरी मशिद वादाचा निकाल आल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या सहकाऱ्यांसोबत एका बैठकीत म्हटले होते की, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर सुपरपावर कमीशन तयार करून या निकालाला शाह बानो प्रकरणाप्रमाणे बदलले जाईल. काँग्रेसने हकालपट्टी करण्याच्या आधीपासून पक्षावर टीका करत असलेल्या कृष्णम यांनी रविवारी दावा केला होता की, ४जूननंतर काँग्रेस दोन गटात विभागली जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

कृष्णम यांनी दावा केला की, प्रियंका गांधी यांना अध्यक्ष बनण्यापासून तसेच राज्यसभेत जाण्यापासून रोखले गेले. लोकसभा निवडणूकही लढू दिली नाही. राहुल गांधींच्या गटाची इच्छा आहे की, प्रियंका राजकारणापासून दूर रहाव्यात. यामुळे प्रियंका गांधी यांच्या जवळच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे.

प्रमोद कृष्णम यांनी म्हटले की, ३२ वर्षाहून अधिक काळ मी काँग्रेसमध्ये घालवला आहे. जेव्हा राम मंदिराचा फैसला आला व राम मंदिर निर्माणाचे काम सुरू झाले. त्यानंतर राहुल गांधींनी आपल्या निकटवर्तीयांच्या एका बैठकीत अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या एका शुभचिंतकाच्या इशाऱ्यावर म्हटले होते की, जर काँग्रेसचे सरकार आले तर आम्ही सुपरपावर कमीशन बनवून राम मंदिराच्या निर्णयाला आव्हान देऊन बदलू. त्यांनी म्हटले होते की, ज्याप्रमाणे शाह बानो निकाल राजीव गांधींनी बदलला होता. जर शाह बानोचा निकाल बदलला जाऊ शकतो तर राम मंदिराचा निकाल का बदलला जाऊ शकत नाही.

प्रमोद कृष्णमम्हणाले की, राम मंदिराबाबतच्या खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तेव्हा राहुल गांधी व त्यांच्या जवळच्या नेत्याच्या बैठकीत ठरलं की, काँग्रेसचं सरकार आलं तर एका शक्तीशाली आयोगाची स्थापना करून राम मंदिराबाबतचा निर्णय बदलून टाकू. मी ३२ वर्षांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये होतो त्यामुळे त्यांची सर्व रणनिती ओळखतो.

प्रमोद कृष्णम सातत्याने काँग्रेसविरोधी वक्तव्ये करत असल्याने तसेच जाहीरपणे भाजपाच्या धोरणांचं स्वागत केल्यानं त्यांची ११ फेब्रुवारी २०२४ रोजी पक्षातून हकालपट्टी केली होती. पक्षविरोधी कारवाया व शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत पक्षाने त्यांना निलंबित केले होते. आचार्य प्रमोद कृष्णम सातत्याने जाहीरपणे पक्षाविरोधात वक्तव्ये करत असल्याने उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्षांकडे पाठवला होता. उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सादर करण्यात आलेली शिफारस मान्य करत काँग्रेसने आचार्य प्रमोद कृष्णम यांची सहा वर्षांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून हकालपट्टी केली.

पुढील बातम्या