Farooq Abdullah controversial statement : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील करण्याबाबत केलेल्या वक्तव्याला उत्तर देतांना जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी वादग्रस्त विधान केले आहे. “पाकिस्तानने देखील हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. त्यांच्याकडेही अणुबॉम्ब आहे. ते आपल्याविरोधात त्याचा वापर करू शकतात”, असे फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. अब्दुल्ला यांच्या या विधानावर त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी वादग्रस्त विधान केले आहे. या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानावर उत्तर देताना त्यांनी टीका केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका निवडणूक रॅलीत बोलतांना पाक व्याप्त काश्मीर संदर्भात विधान केले होते. ते पाक व्याप्त काश्मीर हा आमचा अविभाज्य भाग आहे आणि तो राहील. यापूर्वी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही पीओके हा भारताचा भाग असल्याचे म्हटले होते.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना फारूख अब्दुल्ला म्हणाले की, जर संरक्षण मंत्र्यांना पीओके ताब्यात घ्यायचा असेल तर त्यांनी तो घ्यावा. आम्ही त्यांना रोखणारे कोण आहोत? मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी पाकिस्तानने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे आणि दुर्दैवाने ते त्याचा आपल्या विरोधात वापर करू शकतात.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील लोक स्वतःहून भारतात सामील होण्यासाठी पुढे येतील असे म्हटले होते “पाकव्याप्त काश्मीर हा आमचा भाग होता आणि राहिल”, असे देखील राजनाथ सिंह म्हणाले होते. ते पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथील प्रचार सभेत बोलत होते.
राजनाथ सिंह म्हणाले, कलम ३७० हटवल्यावर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारली आहे. एक वेळ अशी येईल जम्मू काश्मीरमध्ये 'एएफएसपीए' (आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट) ची आवश्यकता देखील राहणार नाही. हा विषय केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारित असून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सिंह म्हणाले होते. जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका नक्कीच होतील, असे देखील ते म्हणाले.
पाक पुरस्कृत दहशतवादाबद्दल संरक्षण मंत्री म्हणाले की, इस्लामाबादला सीमेपलीकडील दहशतवाद थांबवावा लागेल. भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही ते होऊ देणार नाही.' सीमेपलीकडील दहशतवादाला आम्ही सडेतोड उत्तर देऊ असे देखील सिंह म्हणाले होते.