Prajwal Revanna Obscene Video Case: जेडीएस खासदार प्रज्वल रेवन्ना द्वारे कथित रित्या लैंगिक शोषणाच्या शिकार झालेल्या महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यातील अनेक महिलांनी मागील १० दिवसात आपले घर सोडले आहे. हासन मतदारसंघ जेडीएसचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा गड मानला जातो. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल हासनमधून विद्यमान खासदार असून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणार आहेत.
प्रज्वल रेवन्ना २६ एप्रिल रोजी हासनमध्ये मतदान पार पडल्यानंतर देश सोडून पळून गेला आहे. त्याचे वडील व होलेनरासीपूरचे आमदार एचडी रेवन्ना यांना एका महिलेच्या अपहरण प्रकरणात शनिवारी अटक करण्यात आली. हासन जिल्ह्यातील एका गावातील दुकानदाराने म्हटले की, संपूर्ण जिल्हा एचडी रेवन्ना यांच्या ताब्यात आहे. जर त्यांच्याबद्दल कोणी वाईट बोलले तर लगेच त्यांनी माहिती मिळेल. कारण त्यांच्या कुटूंबात व पक्षात कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे.
प्रज्वल विरोधात पहिली एफआयआर २८ एप्रिल रोजी एका महिलेच्या तक्रारीच्या आधारावर नोंदवली होती. त्या महिलेच्या संपूर्ण कुटंबाने गाव सोडले आहे. महिलेच्या शेजाऱ्याने सांगितले की, महिला रेवन्ना यांच्या घरात काम करत होते. त्यानंतर तिचे काही व्हिडिओ व्हायरल झाले व त्यानंतर महिलेच्या घराला टाळे लागल्याचे दिसले. ती कधी घर सोडून गेली कुणालाच माहिती नाही.
प्रज्वलच्या विरोधात बलात्काराची तक्रार करणाऱ्या एका माजी जिल्हा परिषद सदस्याच्या गावातही अशीच स्थिती आहे. माध्यमांशी बोलताना स्थानिक जेडीएस नेत्याने म्हटले की, आम्हाला दिसून आले की, पक्षातील महिला प्रज्वलसोबतचे फोटो डिलीट करत आहेत. काही पुरुष आपल्या पत्नीला विचारत आहेत की, प्रज्वलसोबत तुझे तर संबंध नाहीत ना? यामुळे अनेक महिलांच्या आयुष्यात भूकंप आला आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक महिलांची ओळख समोर आली आहे. त्यामुळे अनेक महिला हासन सोडून जात आहेत. जेव्हा SIT रेवन्नाच्या घरात दाखल झाली तेव्हा बाहेर जमलेल्या पार्टी कार्यकर्तांमध्ये महिलांची चर्चा सुरू होती. एकाने म्हटले की, मी या महिलेला ओळखतो, ती आमच्या घराच्या जवळ राहतो. तसेच जेडीएसच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रीय असते. तिच्या घराला कुलूप असून तिला लहान मुले आहेत.
माध्यमांशी बोलताना एका दुकानदाराने म्हटले की, महिलांचे चेहरे समोर आणायला नको होते. हे चुकीचे आहे. यातील अनेक महिलांना मी ओळखतो. त्या सर्व कोठेतरी गेल्या आहेत. ते लोक केस करणार नाहीत. कारण रेवन्ना कुटूंबाविरोधात तक्रार दाखल करून हासनमध्ये रहाणे शक्य नाही.
हासनमध्ये रेवन्ना यांचे मोठे फार्महाउस आहे. तेथेही SIT पोहोचली होती. रिपोर्टमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले की, प्रज्वल अनेक वेळा फार्महाउसमध्ये आला होते. तेथे कथितरित्या व्हिडिओ रेकॉर्ड केले गेले. येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, प्रज्वल येथे मित्रांसोबत पार्टी करायला येत होते, याशिवाय आम्हाला काही माहिती नाही.
संबंधित बातम्या