मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  stocks: 'बाजार उठला'; सेन्सेक्स हजार अंकांनी गडगडला! ४ लाख कोटींचं नुकसान

stocks: 'बाजार उठला'; सेन्सेक्स हजार अंकांनी गडगडला! ४ लाख कोटींचं नुकसान

Sep 23, 2022, 03:51 PM IST

    • Sensex tanks 1000 points: जागतिक बाजारातील घडामोडींचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले असून सेन्सेक्स तब्बल १ हजारहून अधिक अंकांनी गडगडला आहे.
Stock Market Down

Sensex tanks 1000 points: जागतिक बाजारातील घडामोडींचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले असून सेन्सेक्स तब्बल १ हजारहून अधिक अंकांनी गडगडला आहे.

    • Sensex tanks 1000 points: जागतिक बाजारातील घडामोडींचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले असून सेन्सेक्स तब्बल १ हजारहून अधिक अंकांनी गडगडला आहे.

Stock Market Trading 23 September: महागाईचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारात उमटले आणि सेन्सेक्स व निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्स तब्बल १ हजारहून अधिक अंकांनी कोसळला, तर निफ्टीत ३०० अंकांची घसरण झाली.

ट्रेंडिंग न्यूज

Sunita Williams : मागच्या वेळी नेली भगवदगीता; यावेळी सुनिता विलियम्स 'या' लकी देवतेची मूर्ती अंतराळात नेणार

Rahul Gandhi : राहुल गांधी सुपर पॉवर कमीशन आणून राम मंदिराचा निर्णय बदलणार!, माजी काँग्रेस नेत्याचा दावा

Vande Bharat: जे कधी झाले नाही ते आता होणार, वंदे भारतच्या माध्यमातून भारत चीनचे वाढवणार टेन्शन, ते कसे काय?

Pilgrims from Amravati died: महाराष्ट्रातील चार भाविक पंजाबमध्ये भीषण रस्ते अपघातात ठार

करोनाच्या लॉकडाउनमधून जग सावरत असतानाच रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं आहे. हे युद्ध लांबत चालल्याचा परिणाम अनेक देशांत दिसत आहे. जगभरात सध्या महागाईचा वणवा पेटला आहे. या महागाईला तोंड देण्यासाठी फेडरल रिझर्व्ह बँकेच्या पाठोपाठ युरोप व आशियातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदरांत वाढ केली आहे. येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळं शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. बीएसईच्या यादीत असलेल्या सर्व कंपन्यांचे बाजार भांडवल २७७.५८ कोटींपर्यंत खाली घसरलं आहे. या घडामोडींमुळं गुंतवणूकदारांचं अंदाजे ४ लाख कोटींचे नुकसान झालं आहे.

शेअर बाजाराची सुरुवातच आज लाल निशाण फडकावत झाली. ही घसरगुंडी उत्तरोत्तर वाढतच गेली. बाजार बंद होण्याच्या अर्धा तास आधी सेन्सेक्सच्या घसरणीनं एक हजार अंकांचा टप्पा पार केला. बँका आणि वित्त संस्थांच्या समभागांत मोठी घसरण झाली आहे. देशातील आघाडीच्या HDFC बँकेच्या शेअरमध्ये २.७ टक्क्यांची घसरण झाली आहे.

हे शेअर तेजीत

इंट्राडेमध्ये टाटा स्टील, सन फार्मा, आयटीसी आणि इन्फोसिसचे शेअर्स वगळता सर्व शेअर्स रेड झोनमध्ये होते. टाटा स्टील, इन्फोसिस, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचसीएल टेक सारखे शेअर्स सुरुवातीला वधारले. महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. याशिवाय पॉवर ग्रिड, एचडीएफसी, कोटक बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, एसबीआय, एशियन पेंट, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, टायटन, आयटीसी, नेस्ले, बजाज फिनसर्व्ह या शेअरमध्येही घसरण झाली.

टॉप गेनर्स आणि टॉप लूझर्स

सिप्ला, सन फार्मा, डिवीज लॅब, टाटा स्टील आणि अम्बुजा सिमेंट हे NSE वर सुरुवातीच्या ट्रेडमध्ये टॉप पाच नफा मिळवणाऱ्यांपैकी आहेत. तर, सर्वाधिक नुकसान झालेल्या शेअरमध्ये पॉवर ग्रिड, पंजाब नॅशनल बँक, अपोलो हॉस्पिटल, इंद्रप्रस्थ, हिंडाल्को या शेअर्सचा समावेश आहे.