मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Share Market: टाटाचा ‘हा’ शेअर कमाल करणार; मार्केट एक्सपर्ट म्हणतात…

Share Market: टाटाचा ‘हा’ शेअर कमाल करणार; मार्केट एक्सपर्ट म्हणतात…

Sep 20, 2022, 03:32 PM IST

    • Tata Motors Share Price: गेल्या काही महिन्यांत घसरण होऊनही टाटा समूहाच्या एका शेअरबद्दल मार्केट एक्सपर्ट प्रचंड आशावादी आहेत.
Tata Motors Share

Tata Motors Share Price: गेल्या काही महिन्यांत घसरण होऊनही टाटा समूहाच्या एका शेअरबद्दल मार्केट एक्सपर्ट प्रचंड आशावादी आहेत.

    • Tata Motors Share Price: गेल्या काही महिन्यांत घसरण होऊनही टाटा समूहाच्या एका शेअरबद्दल मार्केट एक्सपर्ट प्रचंड आशावादी आहेत.

Tata Motors Share Price: मागील काही दिवसांपासून कोसळत असलेला टाटा मोटर्सचा शेअर पुन्हा सावरत असून आज तब्बल ३ टक्क्यांनी वाढला आहे. या शेअरचा आजचा भाव ४३४.१० रुपये आहे. हा पुढच्या तेजीचा संकेत असून या शेअरचा भाव रॉकेटच्या वेगानं वर जाईल, असं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : भर विमानात जोडप्याने गाठला निर्लज्जपणाचा कळस! प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की....

WhatsApp : व्हॉट्सॲपने अँड्रॉईड युजर्सना दिले भन्नाट गिफ्ट, स्टिकर्स बनवण्याची मजा झाली द्विगुणित

Fact Check: राहुल गांधी फेसबूक, इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना दरवर्षी एक लाख रुपये देणार? वाचा

Afghanistan floods: अफगाणिस्तानमध्ये पावसाचा कहर, पुरात ३०० हून अधिक जणांचा मृत्यू

टाटा मोर्टसचे युनिट असलेली यूकेमधील जाग्वार लँड रोवर ही कंपनी सध्या सेमीकंडक्टर चीपच्या टंचाईशी सामना करत आहे. टाटा मोटर्स ही कंपनी जाग्वारवर अनेक बाबतीत अवलंबून आहे. टाटा मोटर्सच्या एकूण महसुलात जाग्वार लँड रोवरचा तब्बल ६७ टक्के वाटा असतो. असं असतानाही टाटा मोटर्सच्या शेअरच्या किंमतींबद्दल मार्केट एक्सपर्ट अत्यंत सकारात्मक आहेत.

काय म्हणतात तज्ज्ञ?

  • मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मला टाटा मोटर्सच्या शेअरवर कमालीचा विश्वास आहे. हा शेअर ५१४ रुपयांपर्यंत उसळेल, असं या फर्मला वाटतं. तसं झाल्यास गुंतवणूकदारांना सध्याच्या गुंतवणुकीवर तब्बल २० टक्क्यांहून अधिक परतावा मिळू शकतो. मोतीलाल ओसवालनं हा शेअर खरेदी करण्याबाबत हिरवा कंदील दाखवला आहे.
  • प्रभूदास लिलाधर यांनी टाटा मोटर्सचा शेअर ५१० रुपयांचं लक्ष्य ठेवून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ४३५ रुपयांचा स्टॉप लॉस निश्चित केला आहे. १४ सप्टेंबर रोजी ब्रोकरेजने ही शिफारस केली, तेव्हा टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत ४५३ रुपये होती.
  • टाटा मोटर्स ५२० रुपयांपर्यंत जाईल, असं शेअर इंडियाचे रिसर्च हेड रवी सिंग यांनी म्हटलं आहे. ४४० रुपयांच्या स्टॉप लॉससह गुंतवणूकदार दीर्घ कालावधीसाठी यावर डाव लावू शकतात, असं त्यांचं मत आहे.

सध्याची स्थिती काय?

रशिया-युक्रेन युद्ध आणि जगभरातील करोना लॉकडाऊनच्या संकटामुळं टाटा मोटर्सच्या शेअरच्या किंमतीवर मोठा परिणाम झाला आहे. एका वर्षात हा शेअर ४७ टक्क्यांनी वाढला असला तरी चालू वर्षात तो १२ टक्क्यांनी घसरला आहे.

टाटा मोटर्सचे बाजार भांडवल १.४५ लाख कोटी इतके आहे. मागील वर्षी १७ नोव्हेंबर २०२१ रोजी या कंपनीच्या शेअरनं ५२ आठवड्यांचा उच्चांक ५३६.५० गाठला होता, तर २१ सप्टेंबर२०२१ रोजी २९३.०५ रुपयांचा नीचांक गाठला होता.

 

(वैधानिक सूचना: ही माहिती बाजारातील आकडेवारीवर आधारित असून त्यात शेअर मार्केटमधील तज्ज्ञांची मते नोंदवली आहेत. हा कुठल्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांनी आपापल्या सल्लागारांच्या मदतीनेच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या