मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Stock Market: सुप्रीम कोर्टाचा एक आदेश काय आला, शेअरचा भाव कोसळला; कोट्यवधींचं नुकसान

Stock Market: सुप्रीम कोर्टाचा एक आदेश काय आला, शेअरचा भाव कोसळला; कोट्यवधींचं नुकसान

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 22, 2022 05:43 PM IST

Fortis Healthcare stock: सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळं फोर्टिस हेल्थकेअर कंपनीचा शेअर गडगडला असून त्यामुळं गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.

Stock Market
Stock Market

Fortis Healthcare stock: शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नफ्याचे आकडे जितके सुखावणारे असतात, तितकेच तोट्याचे आकडे धक्कादायक असतात. शेअरच्या भावातील चढउतार अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. बाजाराशी थेट संंबंध नसलेल्या एखाद्या बाह्य गोष्टींमुळंही शेअरचा भाव पडू किंवा वाढू शकतो. फोर्टिस हेल्थकेअरच्या गुंतवणूकदारांना आज याची प्रचिती आली.

फोर्टिस हेल्थकेअरच्या शेअरमध्ये गुरुवारी मोठी घसरण झाली. कंपनीचे शेअर १६ टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. काल फोर्टिसच्या शेअरचा भाव ३११.३५ रुपये इतका होता, तो आज २६०.२५ रुपयांपर्यंत घसरला. गेल्या १५ वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण आहे. सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय यासाठी कारण ठरल्याचं बोललं जातं.

सर्वोच्च न्यायालयानं मलेशियाच्या आयआयएच हेल्थकेअर (IIH Healthcare) व फोर्टिस हेल्थकेअरमधील कराराचं प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयाकडं परत पाठवलं असून फॉरेन्सिक ऑडिटरच्या नियुक्तीचा विचार करण्याचे निर्देशही दिले आहेत. आयएचएच हेल्थकेअरनं दिलेल्या खुल्या विक्रीच्या प्रस्तावावर दिल्ली उच्च न्यायालय निर्णय घेईल, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. त्याचा परिणाम आज बाजारात दिसला.

काय आहे प्रकरण?

मलेशियाच्या IHH हेल्थकेअरनं २०१८ साली फोर्टिसमध्ये ३१ टक्के कंट्रोलिंग स्टेक खरेदी केला होता. स्वतंत्र मंडळाच्या देखरेखीखाली हा व्यवहार झाला होता. त्यावेळी आयआयएचनं १.१ अब्ज डॉलर देऊन फोर्टिसमध्ये भागभांडवल विकत घेतलं होतं. त्यानंतर कंपनीला आणखी २६ टक्के शेअर्स घेण्यासाठी अनिवार्य ओपन ऑफर द्यावी लागली. मात्र, ओपन ऑफरला जपानमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी औषध निर्मिती कंपनी असलेल्या डायची सँक्योनं आक्षेप घेतल्यामुळं पुढील प्रक्रिया स्थगित झाली. 

Gutam Adani : गौतम अदानींना धक्का; जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत घसरण, मस्क अग्रस्थानी कायम

'डायची सँक्यो'नं यापूर्वी फोर्टिसचे संस्थापक मालविंदर सिंह आणि शिविंदर सिंह यांच्या विरोधात सिंगापूरच्या लवादापुढं फसवणुकीचा दावा केला होता. त्याचा निकाल 'डायची सँक्यो'च्या बाजूनं लागला होता. फोर्टिस-आयएचएचमधील ३,६०० कोटींच्या करारालाही या कंपनीनं आव्हान दिलं होतं. सिंग बंधू आणि इंडियाबुल्स यांनी मिळून फोर्टिस हेल्थकेअर होल्डिंगचे १.७ दशलक्ष शेअर गहाण ठेवल्याचा आरोप केला होता. अर्थात, सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली होती.

WhatsApp channel

विभाग