मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Train Accident Odisha : मृतदेहांमध्ये मुलाला शोधणाऱ्या वडिलांची हतबलता, पाहा हृदयद्रावक व्हिडिओ

Train Accident Odisha : मृतदेहांमध्ये मुलाला शोधणाऱ्या वडिलांची हतबलता, पाहा हृदयद्रावक व्हिडिओ

Jun 03, 2023, 07:45 PM IST

    • Odisha Train Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालासोरमधील घटनेची पाहणी केली असून रुग्णालयात जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
Coromandel Express Train Accident Odisha (PTI)

Odisha Train Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालासोरमधील घटनेची पाहणी केली असून रुग्णालयात जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

    • Odisha Train Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालासोरमधील घटनेची पाहणी केली असून रुग्णालयात जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

Coromandel Express Train Accident Odisha : ओडिशातील बालासोरमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या तीन रेल्वेंच्या अपघातात आतापर्यंत २८४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय १५०० प्रवासी जखमी झाले आहे. जखमींचा आकडा मोठा असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तीन रेल्वेंचा अपघात झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या कुटुंबियांना मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. त्यानंतर तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि ओडिशातील अनेक लोकांनी हेल्पलाईनद्वारे आपल्या आप्तजनांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच काहींनी थेट घटनास्थळी धाव घेत जखमी कुटुबियांची भेट घेतली आहे. तसेच अनेक प्रवासी रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडल्याने अनेकांना मृतांची ओळख पटवणं अवघड झालं आहे. त्यातच आता बालासोरच्या रुग्णालयातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

passport fake websites : पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! खोट्या पासपोर्ट वेबसाइट्समुळे अर्जदारांची फसवणूक

Sunita Williams : मागच्या वेळी नेली भगवदगीता; यावेळी सुनिता विलियम्स 'या' लकी देवतेची मूर्ती अंतराळात नेणार

Rahul Gandhi : राहुल गांधी सुपर पॉवर कमीशन आणून राम मंदिराचा निर्णय बदलणार!, माजी काँग्रेस नेत्याचा दावा

Vande Bharat: जे कधी झाले नाही ते आता होणार, वंदे भारतच्या माध्यमातून भारत चीनचे वाढवणार टेन्शन, ते कसे काय?

व्हायरल व्हिडिओत एका खोलीत असंख्य मृतदेह पडलेले आहे. त्यात एक वडील आपल्या मुलाचा मृतदेह शोधताना दिसत आहे. यावेळी वडील आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचं समजताच रडायला लागले असून सापडत नसल्याने त्यांनी हतबलता व्यक्त केली आहे.

मी सुखगावचा आहे, माझा मुलगा कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये होता. मी त्याला शोधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तो सापडतच नाहीय. पोलिसांशी बोललोय परंतु तरीही त्याचा अद्याप काही तपास लागलेला नाही, असं म्हणत मृत मुलाच्या वडिलांनी आक्रोश केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मुलाच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी त्यांचा मुलगा सुखरुप असावा, यासाठी देवाकडे साकडे घातले आहे.

ओडिशातील तीन रेल्वे अपघातात आतापर्यंत २८४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. १५०० जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. आज दुपारी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्यानंतर या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहे. जखमींना आवश्यक सर्व मदत देण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासनाला दिल्या आहे. जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.