Train Accident Odisha : ओडिशातील रेल्वे अपघातावर व्लादिमीर पुतिन यांचा शोकसंदेश, म्हणाले...
odisha train accident live : ओडिशातील रेल्वे अपघातावर देशातील सेलिब्रिटी तसेच अनेक मान्यवर नेत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
Russian President Vladimir Putin On Train Accident Odisha : ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वेंचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत तब्बल २६१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून दीड हजारावर लोक जखमी झाले आहे. जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्यानंतर रेल्वे अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहे. रेल्वे अपघातानंतर देशातील अनेक नेते, मान्यवर आणि सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. त्यानंतर आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी देखील ओडिशातील रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एक पत्रक जारी केलं आहे. त्यात त्यांनी ओडिशातील रेल्वे अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहे. तसेच रेल्वे दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करतो, असंही राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे. ओडिशातील रेल्वे अपघात हा भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक मानला जात आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने देखील ओडिशातील रेल्वे अपघातावर दुःख व्यक्त केलं आहे.
शुक्रवारी रात्री कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस यांच्यात भीषण अपघात झाला. यावेळी आणखी एक मालगाडी अपघातग्रस्त रेल्वेंना येऊन धडकली. त्यामुळं दोन्ही रेल्वेगाड्यांचे डबे एकमेकांवर आदळले. या दुर्दैवी अपघातात आतापर्यंत तब्बल २६१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून दीड हजार लोक जखमी झाले आहे. भारतीय लष्कर, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांकडून घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू आहे. ओडिशा सरकार तसेच केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत घोषित करण्यात आली आहे.