मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  DC vs RR Head to Head: दिल्ली- राजस्थानमध्ये कोणत्या संघाचा वरचष्मा, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

DC vs RR Head to Head: दिल्ली- राजस्थानमध्ये कोणत्या संघाचा वरचष्मा, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 07, 2024 10:27 AM IST

Delhi Capitals vs Rajasthan Royals Head to Head Record: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमधील ५६वा सामना खेळला जाणार आहे.

आयपीएलच्या ५६व्या सामन्यात दिल्ली- राजस्थान आमनेसामने असतील.
आयपीएलच्या ५६व्या सामन्यात दिल्ली- राजस्थान आमनेसामने असतील. (AFP)

IPL 2024: आयपीएल 2024 चा ५६ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. दिल्लीतील (Delhi) अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. एकीकडे दिल्लीचा संघ आहे, ज्याने आतापर्यंत पाच सामने जिंकले आहेत आणि सहा सामने गमावले आहेत. मात्र, तरीही दिल्लीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. दुसरीकडे, राजस्थानचा संघ १६ गुणांसह प्लेऑफसाठी जवळजवळ पात्र झाला आहे. दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. दिल्ली आणि राजस्थानमध्ये कोणाचा वरचष्मा आहे ते जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स तब्बल २८ वेळा आमनेसामने आले. यातील १३ सामन्यात दिल्लीच्या संघाने विजय मिळवला आहे. तर, राजस्थानने १५ सामने जिंकले आहेत. पाहिले तर राजस्थानचा वरचष्मा दिसतो. मात्र, आज कोणता संघ बाजी मारतो हे पाहायचे आहे.

DC vs RR Live Streaming: दिल्लीचा संघ आज बलाढ्य राजस्थानशी भिडणार; कधी, कुठे पाहायचा सामना?

खेळपट्टीचा अहवाल

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. येथील खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर ती फलंदाजांसाठी अनुकूल आहे. कारण येथील खेळपट्टी सपाट असल्यामुळे चेंडू थेट बॅटवर येतो. येथे गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाही. सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना अचूक गोलंदाजी करावी लागेल, जेणेकरून ते विरोधी संघाला बचावात्मक धावसंख्येपर्यंत रोखू शकतील.

MI vs SRH Head to Head: मुंबई-हैदराबादमध्ये आज रंगणार क्रिकेटचा थरार; जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड आणि संभाव्य संघ

दिल्लीचा संभाव्य संघ:

डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश यादव, इम्पॅक्ट प्लेअर: रसिक सलाम

राजस्थानचा संभाव्य संघ:

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (सी, विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, इम्पॅक्ट प्लेअर- युजवेंद्र चहल.

IPL_Entry_Point