मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  DC vs RR Live Streaming: दिल्लीचा संघ आज बलाढ्य राजस्थानशी भिडणार; कधी, कुठे पाहायचा सामना?

DC vs RR Live Streaming: दिल्लीचा संघ आज बलाढ्य राजस्थानशी भिडणार; कधी, कुठे पाहायचा सामना?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 07, 2024 10:08 AM IST

Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमधील ५६वा सामना खेळला जाणार आहे.

आयपीएल २०२४: दिल्ली कॅपिटल्ससमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान असणार आहे.
आयपीएल २०२४: दिल्ली कॅपिटल्ससमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान असणार आहे.

IPL 2024: आयपीएल २०२४ च्या ५६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना राजस्थान रॉयल्स एकमेकांशी भिडणार आहेत. आयपीएलच्या चालू हंगामात दिल्ली आणि राजस्थानच्या संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. राजस्थानच्या संघाने दिल्लीविरुद्धचा हा सामना जिंकल्यास त्यांचे प्लेऑफचे तिकीट निश्चित होईल. दुसरीकडे दिल्लीचा संघ हा सामना हरला तर त्याची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता जवळपास संपुष्टात येईल.

ट्रेंडिंग न्यूज

या हंगामात दिल्लीच्या संघाने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. तर, सहा सामन्यात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. दुसरीकडे राजस्थानच्या संघाने यंदाच्या हंगामात सातत्य दाखवत उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. राजस्थानने आतापर्यंत खेळलेल्या १० पैकी आठ सामने जिंकले आहेत. राजस्थानचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

Team India Jersey : टीम इंडियाची वर्ल्डकप जर्सी चाहत्यांना आवडेना, म्हणाले ‘ एकदम बकवास!’

कधी, कुठे पाहणार सामना?

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज (०७ मे २०२४) आयपीएलमधील ५६वा सामना खेळला जाईल. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, राजस्थान आणि दिल्ली यांच्यातील सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

MI Vs SRH : वानखेडेवर सूर्यकुमार यादवच्या शतकाचे वादळ... पॅट कमिन्सच्या हैदराबादचा ७ विकेट्सनी धुव्वा

राजस्थान रॉयल्सचा संघ:

यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोव्हमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, जोस बटलर, टॉम कोहलर-कॅडमोर, शुभम दुबे, नवदीप सैनी, तनुष कोटियन, केशव महाराज, नांद्रे बर्गर, कुलदीप सेन, डोनोवन फरेरा, आबिद मुश्ताक, कुणाल सिंग राठौर.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ:

पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकिपर, कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद, मुकेश कुमार, सुमित कुमार , प्रवीण दुबे, कुमार कुशाग्रा, रिकी भुई, इशांत शर्मा, डेव्हिड वॉर्नर, गुलबदिन नायब, झ्ये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, ललित यादव, यश धुल, विकी ओस्तवाल, स्वस्तिक चिकारा.

IPL_Entry_Point