मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  passport fake websites : पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! खोट्या पासपोर्ट वेबसाइट्समुळे अर्जदारांची फसवणूक

passport fake websites : पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! खोट्या पासपोर्ट वेबसाइट्समुळे अर्जदारांची फसवणूक

May 07, 2024, 08:33 AM IST

    • passport fake websites : परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट महत्वाचे डॉक्युमेंट आहे. ही काढण्याची पद्धत देखील किचकट आहे. अनेक जण पासोपोर्ट काढत असतात. मात्र, हे पासपोर्ट काढत असतांना बनावट संकेतस्थळावरून फसवणूक होत असल्याचे उघड झाले आहे.
पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी बातमी! खोट्या पासपोर्ट वेबसाइट्समुळे अर्जदारांची फसवणूक

passport fake websites : परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट महत्वाचे डॉक्युमेंट आहे. ही काढण्याची पद्धत देखील किचकट आहे. अनेक जण पासोपोर्ट काढत असतात. मात्र, हे पासपोर्ट काढत असतांना बनावट संकेतस्थळावरून फसवणूक होत असल्याचे उघड झाले आहे.

    • passport fake websites : परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट महत्वाचे डॉक्युमेंट आहे. ही काढण्याची पद्धत देखील किचकट आहे. अनेक जण पासोपोर्ट काढत असतात. मात्र, हे पासपोर्ट काढत असतांना बनावट संकेतस्थळावरून फसवणूक होत असल्याचे उघड झाले आहे.

passport fake websites : परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट महत्वाचे डॉक्युमेंट आहे. ही काढण्याची पद्धत देखील किचकट आहे. अनेक जण पासोपोर्ट काढत असतात. मात्र, हे पासपोर्ट काढत असतांना बनावट संकेतस्थळावरून फसवणूक होत असल्याचे उघड झाले आहे. पासपोर्ट लवकर तयार करण्यासाठी अर्जदार खोट्या वेबसाइटला बळी पडत आहेत. बनावट संकेतस्थळावर लवकरच अपॉइंटमेंटची व्यवस्था केली जात असून शुल्काच्या पावत्याही दिल्या जात आहेत. मात्र अर्ज जमा होत नाही. दर महिन्याला मोठ्या संख्येने अर्जदार या बनावट संकेतस्थळांना बळी पडत आहेत. या फसवणुकीपासून लोकांना वाचवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत साइटवर सर्व बनावट वेबसाइट्सची यादी जारी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

Baramati: बारामतीत पैशांचा पाऊस, मध्यरात्र उलटूनही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज सुरु, रोहित पवारांचा गंभीर आरोप

पासपोर्ट लवकर मिळवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. या टोळ्यांनी अनेक खोट्या वेबसाईट तयार केल्या आहेत. जागरूकतेच्या अभावामुळे नागरिक यांना बळी पडत आहेत. या वेबसाइटची निवडण करून पासपोर्टसाठी अर्ज केला जातो. या दरम्यान फसवणूक करणारे अर्जदारांची संपूर्ण माहिती घेतात. यासोबतच बनावट आणि लवकर लवकर तयार करण्यात आलेले खोटे पासपोर्ट दाखवून जास्त शुल्क नागरिकांकडून आकारले जाते. अपॉइंटमेंट शेड्यूलनुसार अर्जदार त्यांचे फॉर्म सबमिट करण्यासाठी कार्यालयात जातात तेव्हा त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे कळते. अनेक लोक वेबसाइटचा तपशील घेऊन खऱ्या पासपोर्टच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करतात, मात्र, त्या ठिकाणी जास्त पैसे आकरले जातात.

Lok sabha Election 3 phase voting live : बारामती, म्हाड्यासह राज्यातील ११ मतदार संघात मतदानाला सुरुवात; दिग्गजांचे मतदान

गाझियाबाद प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय १३ जिल्ह्यांतील नागरिकांना पासपोर्ट वितरित करते. दररोज दोन हजार अर्जदार या साठी अर्ज करतात. तर दर महिन्याला शेकडो अर्जदार या बनावट वेबसाइटला बळी पडत असल्याचे उघड झाले आहे. विभागाच्या मूळ वेबसाइटवर बनावट वेबसाइटची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दुप्पट शुल्क केले जाते वसूल

सामान्यत: पासपोर्ट अर्ज शुल्क हे दीड हजार रुपये आहे. तर तात्काळ पासपोर्ट काढण्याचे शुल्क हे ३ हकर ५०० रुपये आहे. परंतु तात्काळसाठी २ हजार रुपये फक्त फॉर्म सबमिशनच्या वेळी घेतले जातात. बनावट वेबसाईटवर लगेच अर्ज करून ३,५०० रुपये घेतले जातात. जेव्हा अर्जदार फॉर्म सबमिट करण्यासाठी कार्यालयात पोहोचतो, तेव्हा त्याला ज्या वेबसाइटवरून अपॉइंटमेंट घेतली होती ती खोटी असल्याचे कळते. या वेबसाइटने विभागाच्या मुख्य साइटवर फक्त दीड हजार रुपयांची रक्कम लॉक करण्यात आली आहे. असे असतांना फसवणूक करणारे त्यांच्या नागरिकांकडून दोन हजार रुपये घेतात. आणि अर्जदार फॉर्म भरण्यासाठी गेल्यावर त्यांना पुन्हा दोन हजार रुपये जागेवर जमा करावे लागतात.

Maharashtra Weather Update:विदर्भ तापला! बहुतांश जिल्ह्यात पारा ४३ पार; अकोला, वर्धा, नागपूरला हीट वेव्ह व पावसाचा इशारा

रीशेड्यूलिंगमध्ये समस्या

जर अर्जदाराला दिलेल्या नियोजित वेळेत जाण्यास शक्य होत नसेल तर त्याला पुन्हा नवी अपॉइंटमेन्ट मिळण्यास अनेक अडचणी येतात. ही सेवा बनावट वेबसाइटवर उपलब्ध नाही, कारण अर्जदाराला माहिती नसते आणि बनावट वेबसाइटचे लोक त्यांच्या आयडीद्वारे एकाच वेळी अर्ज करतात. अनेक वेळा रिशेड्युलच्या नावाखाली पैसे देखील घेतले जातात.

गाझियाबादचे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी अनुज स्वरूप यांनी सांगितले की, पासपोर्टची अधिकृत वेबसाइट www.passportindia आहे. gov.in याशिवाय कोणतीही अधिकृत वेबसाइट नाही. अर्ज करताना अर्जदारांनी या वेबसाइटला भेट द्यावी.

ही आहे अधिकृत पासपोर्ट वेबसाइट

* www.passportindia.org.in

या आहेत बनावट साइट्स

* www.indiapassport.org, www.online-passportindia.com

* www.passportindiaportal.in

* www.passport-india.in

* www.passport-seva.in

* www.applypassport.org

विभाग

पुढील बातम्या