Baramati Lok Sabha Election : बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान सुरू झाले आहे. दरम्यान, हे मतदान सुरू होण्याआधी आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आमदार रोहित पावर यांनी मध्यरात्री ट्विट करून अजित पवार मित्र मंडळावर पैसे वाटप झाल्याचा आरोप केला आहे. या साठी जिल्हा बँक मध्य रात्री उघडी ठेवण्यात आल्याचे देखील आरोप त्यांनी केला आहे. याचे व्हिडिओ देखील त्यांनी उपलोड केले असून त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. हा प्रकार भोर तालुक्यात एका गावात झाल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्षांनी देखील केला आहे. बारामतीतील आमराई, मुजावर वाडा परिसरात पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी देखील याला उत्तर दिले आहे. विरोधक खोटा अपप्रचार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बारामती मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली आहे. आज सकाळी रोहित पवार, राजेंद्र पवार यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कतेवाडी येथे आई, पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी अजित पवार गटावर पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. दमदाटी करून दादागिरी केली जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. भोर तालुक्यात एका गावात रात्री पैशांचे वाटप करण्यात आले असून त्याचे व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर टाकले आहेत.
भोर तालुक्यातील एका गावात रात्री पोलिस बंदोबस्तात पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. पैसे वाटणारे लोक अजित दादा मित्रमंडळाचे कार्यकर्ते असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. या आरोपानंतर काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्या वाहनातून पैसे वाटल्याचा आरोप केला जात आहे त्या वाहनाच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. तणावातून वाहनाच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या. संशयीत वाहनामध्ये घड्याळ चिन्हाचे प्रचार करणारे काही साहित्य देखील आढळले.
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भोर तालुक्यात अजित पवार मित्र मंडळातर्फे हे पैसे वाटण्यात आले आहे. या घटनेमुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या गावात तणावपूर्ण शांतता आहे. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचे खिसे आणि वाहने तपासणी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान, मध्यरात्री गावात तुमचे काम काय आहे? अशी ग्रामस्थांकडून विचारणा देखील करण्यात आली आहे.
ऐवढेच नाही तर वेल्हेतील जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा ही मध्यरात्री १२ पर्यंत सुरू होती. मतदान असल्याने कदाचित बँका सुरू अस्तीतळ असे रोहित पवार म्हणाले आहे.
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, विचारांची कास सोडलेल्यांना दिवसा सामान्य लोकांची कामं करता येत नाहीत. मात्र बारामती मतदारसंघात निवडून येण्यासाठी रात्रभर जे ‘उद्योग’ सुरू आहेत ते भयंकर असून त्याचे व्हिडिओ आहेत. असे असले तरी स्वाभिमानी मतदार विकला जाणार नाही. अपेक्षा आहे निवडणूक आयोग झोपेत नसेल आणि यावर कायदेशीर कारवाई होईल.
रोहित पवार यांनी भोर तालुक्यातील एका गावातील व्हिडिओ शेयर केला आहे. यामध्ये भोर तालुक्यातील 'अजितदादा मित्रमंडळा'चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसत असून या साठी वाय पल्स दर्जाची सुरक्षा हवी होती का असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तर जिल्हा बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय असे ट्विट करत आत्ता रात्रीचे १२ वाजले तरी बँक सुरू आहे. मतदान असल्यामुळे आज रात्रभर बँकेचा ओव्हर टाईम सुरू असावा असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांनी या आरोपांना उत्तर दिले आहे. हे आरोप त्यांनी चुकीचे म्हटले आहे. कतेवाडी येथे सहपरिवार मतदानाचा हक्क बाजवल्यावर त्यांनी मध्यमानशी संवाद साधला. पवार म्हणाले, जे व्हिडिओ दाखवण्यात आले आहे ते कालचे होते ते कशावरून ? विरोधक चुकीचे आरोप करत आहेत. ज्यांनी आरोप केले आहे त्यांची मनस्थिती काय आहे हे दिसून येते. मतदारांना भरकटवन्याचे काम सुरू आहे.
अजित पवार म्हणले, मी माझी आई आणि सुनेत्रा यांच्यासह काटेवादी येथे मतदान केले आहे. ही भावकीची गावकीची निवडणूक नाही. मात्र, त्यांच्यातील काहींनी तसे दाखवण्याचे काम त्यांनी केले आहे. आज माझी आई माझ्या बरोबर आहे. त्याची नोंद त्यांनी घ्यावी. आम्ही माहायुती या नात्याने प्रचार केला आहे. माझ्यावर अनेक आरोप झाले आहे. मी त्याला फारसे महत्व दिले नाही. मी विकासावर बोललो आहे. माझ्या शेवटच्या प्रचार सभेत देखील मी हेच बोललो होतो. त्यामुळे त्याला मोठी गर्दी देखील झाली होती. आमचा सर्व मतदार संघात पोहचण्याचा प्रयत्न होता. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले आहे, असेही पवार म्हणाले.