Lok sabha Election 3 phase voting live : महाराष्ट्रात ११ मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok sabha Election 3 phase voting live : महाराष्ट्रात ११ मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान

Lok sabha Election 3 phase voting live : महाराष्ट्रात ११ मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान

May 07, 2024 12:38 PM IST

Maharashtra Lok Sabha Election : देशात लोकसभा निवडणुकांसाठी तिसरा टप्प्याचे मतदान आज होत आहे. राज्यात ११ तर देशात ९३ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. देशातील ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात तर गुजरातमधील सर्व २५ जागांवर मतदान होईल. सूरतची एक जागा भाजपने बिनविरोध जिंकली आहे.

 पंतप्रधान मोदींनी केले मतदान जनतेला केले आवाहन
पंतप्रधान मोदींनी केले मतदान जनतेला केले आवाहन

Lok sabha Election 3 phase voting live : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. महाराष्ट्रात ११ जागांवर, उत्तर प्रदेशात १० जागांवर, कर्नाटकातल्या उर्वरित १४ जागा, छत्तीसगडमधील ७, मध्य प्रदेशातल्या ८, बिहारमधील ५, आसाममधील ४ तर पश्चिम बंगाल आणि गोव्यातल्या प्रत्येकी दोन जागांवर आज मतदान होईल. याशिवाय दादरा नगर हवेली, दमण दीव या केंद्रशासित प्रदेशातही उद्या मतदान होत आहे. तर अनंतनाग राजौरीमधील मतदान सहाव्या टप्प्यात होणार आहे.

राज्यातील ११ मतदारसंघात दिग्गजांचं भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद

राज्यातल्या ११ लढतींपैकी बारामती, माढा, सांगली, कोल्हापूर या मतदारसंघांची सर्वाधिक उत्सुकता लागली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने भाजप विरूद्ध काँग्रेस अशी लढत होती. मात्र आता नव्याने निर्माण झालेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गट यांचे उमेदवार या तिसऱ्या टप्प्याच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या सर्व पक्षांचा कस आज लागणार आहे. ११ लढतींपैकी य मतदारसंघांमधली लढत चुरशीची होत असून साऱ्या राज्याचं त्याकडं लक्ष लागलेलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात ११वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान झाले आहे.

लातूर - २०.७४ टक्के

सांगली - १६.६१ टक्के

बारामती - १४.६४ टक्के

हातकणंगले - २०.७४ टक्के

कोल्हापूर -२३.७७ टक्के

माढा -१५ .११ टक्के

उस्मानाबाद -१७.०६ टक्के

रायगड -१७.१८ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के

सातारा -१८.९४ टक्के

सोलापूर -१५.६९ टक्के

 

महाडमध्ये मतदानकेंद्राबाहेर मतदाराचा मृत्यू

रायगड लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रापासून अवघ्या १००  मीटर अंतरावर असताना मतदाराचा मृत्यू ओढावल्याची घटना महाड तालुक्यात घडली आहे. येथील किंजळोली दाभेकर कोंडमध्ये मतदानाला निघालेल्या प्रकाश चीनकडे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

महाराष्ट्रात सकाळी ९पर्यंत ६.६४ टक्के मतदान, जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी

 देशात लोकसभा निवडणुकांसाठी तिसरा टप्प्याचं मतदान आज होतंय. आज राज्यात ११ तर देशात ९३ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. राज्यात आज कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, पश्चिम महाराष्ट्रात बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, तर मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर या मतदारसंघात मतदान होणार आहे. ९ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.  राज्यात एकूण ६.६४ टक्के मतदान झाले आहे. यात लातूर येथे  ७. ९१,  सांगली येथे ५.८१,  बारामती येथे ५.७७,  हातकणंगले येथे ७.५५,  कोल्हापूर येथे ८.४,   माढा येथे ४.९९,  धाराशिव येथे ५.७९,  रायगड येथे ६.८४,  रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथे ८.१७ टक्के,  सातारा येथे ७ टक्के,  सोलापूर येथे ५.९२ टक्के मतदान झाले. 

शरद पवार यांचे मुंबईऐवजी माळेगाव येथे मतदान

बारातमी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीच्या माळेगावमधून मतदान केले. पवार मतदानासाठी केंद्रावर आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजाविला. पवार यांच्यासह त्यांच्या अन्य कुटुंबियांनीही मतदान केले.

मतदान केल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

मतदान केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी काल रात्रीच आंध्रमधून आलो आहे. आता मला एमपी, महाराष्ट्र, तेलंगणा येथे जायचे आहे. त्यामुळे इतक्या कमी वेळात मी जास्त बोलू शकणार नाही. पण, या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या देशभरातील मतदारांचे मी अभिनंदन करू इच्छितो. त्यामुळे देशवासियांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन मोदी यांनी केले आहे.  

गुजरातमधील अहमदाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मतदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी गुजरातमधील अहमदाबाद येथील निशान उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान केले. याआधी पंतप्रधान मोदींनी लोकांना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले होते.

गंगेवाडी येथील मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक अडचण, मतदान थांबले

Praniti Shinde vs Ram Satpute: लुक्यातीदक्षिण सोलापूर ताल गंगेवाडी येथील मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक अडचण समोर आली आहे. व्हीव्हीपॅट बंद असल्याने मागील १५ ते २० मिनिटांपासून मतदान थांबले आहे. दोन वेळा मशीन बदलून पाहिल्यानंतर देखील मशीनमध्ये तांत्रिक अडचण समोर येत आहे.

पंतप्रधान मोदी आणि शहा मतदान करणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी अहमदाबादमधील निशान उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अहमदाबादमधून भाजपचे उमेदवार आहेत. शहा यांच्या विरोधात काँग्रेसच्या सोनल पटेल रिंगणात आहेत. २०१९ मध्येही अमित शहा अहमदाबादमधून विजयी झाले होते.

 

आज अजित पवार यांनी सहकुटुंब मतदान केले आहे. यावेळी माध्यमांशी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज बारामतीत तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. मी माझे मत कतेवाडी येथे माझी आई आणि सुनेत्रा यांनी मतदान केले आहे.
आज अजित पवार यांनी सहकुटुंब मतदान केले आहे. यावेळी माध्यमांशी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज बारामतीत तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. मी माझे मत कतेवाडी येथे माझी आई आणि सुनेत्रा यांनी मतदान केले आहे.

ही गावकी भावकीची नाही तर देशाची निवडणूक : अजित पवार

आज अजित पवार यांनी सहकुटुंब मतदान केले आहे. यावेळी माध्यमांशी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज बारामतीत तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. मी माझे मत कतेवाडी येथे माझी आई आणि सुनेत्रा यांनी मतदान केले आहे. ही भावकीची गावकीची निवडणूक नाही. मात्र, त्यांच्यातील काहींनी तसे दाखवण्याचे काम त्यांनी केले आहे. आज माझी आई माझ्या बरोबर आहे. त्याची नोंद त्यांनी घ्यावी. आम्ही माहायुती या नात्याने प्रचार केला आहे. माझ्यावर अनेक आरोप झाले आहे. मी त्याला फारसे महत्व दिले नाही. मी विकासावर बोललो आहे. माझ्या शेवटच्या प्रचार सभेत देखील मी हेच बोललो होतो. त्यामुळे त्याला मोठी गर्दी देखील झाली होती. आमचा सर्व मतदार संघात पोहचण्याचा प्रयत्न होता. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले आहे.

बारामती येथील पिंपळी येथे आमदार रोहित पवार आणि राजेंद्र पवार यांनी कुटुंबीयासह मतदानाचा हक्क बजावला.
बारामती येथील पिंपळी येथे आमदार रोहित पवार आणि राजेंद्र पवार यांनी कुटुंबीयासह मतदानाचा हक्क बजावला.

राजेंद्र पवार आणि रोहित पवार यांचे सहकुटुंब मतदान

बारामती येथील पिंपळी येथे आमदार रोहित पवार आणि राजेंद्र पवार यांनी कुटुंबीयासह मतदानाचा हक्क बजावला. रोहित पवार यांनी काल रात्री ट्विट करत अजित पवार गटावर पैसे वाटप केल्याचा आरोप केल्याचा आरोप केला होता. याला रडीचा डाव असल्याचे अजित पवार गटाने म्हटले आहे.

Baramati: बारामतीत अजित पवार यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

बारामती येथे आज अजित पवार यांनी सहकुटुंब येत मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्या आई देखील त्यांच्या सोबत होत्या. तर सुनेत्रा पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

माझ्यासाठी एक दिवस द्या; ओमराजे निंबाळकरांचं आवाहन

"आज देशातील सर्वोच्च सभागृहाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडतेय. मागच्या अडीच वर्षात लोकशाही पायदळी तुडवली गेली आहे. ही निवडणूक मतदारांनी हाती घेतली आहे. तुमच्यासाठी ५ वर्ष दिलीत, माझ्यासाठी एक दिवस द्या.", असं आवाहन ओमराजे निंबाळकर यांनी केले.

Satara : साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क

सातारा येथे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सकाळी सात वाजताच मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर जनतेला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत चालणार मतदान

आज सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळ पासून नागरिकांचा मतदानासाठी उत्साह दिसून येत आहे. बारामती येथे मतदान केंद्राबाहेर मंतदारांच्या रांगा लागण्यास सुरवात झाली आहे. हे मतदान संध्याकाळी ७ पर्यंत चालणार आहे.

बारामती येथे मॉकपोल सुरू असताना.
बारामती येथे मॉकपोल सुरू असताना.

बारामती लोकसभा मतदार संघाकडे सर्व जगाचे लक्ष

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदार संघाकडे सर्व जगाचे लक्ष लागून आहे. येथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत होणार आहे. एकमेकांवर आरोप करत दोन्ही बाजूने विजयाचा दावा करण्यात आला आहे. मात्र, आज मतदार काय ठरवतील यावर दोघांचेही भवितव्य ठरणार आहे.

 

बारामती लोकसभा मतदार संघातील अनेक मतदार केंद्रांना सजवण्यात आले आहे. येथे सेल्फी पॉइंट देखील उभारण्यात आला आहे.
बारामती लोकसभा मतदार संघातील अनेक मतदार केंद्रांना सजवण्यात आले आहे. येथे सेल्फी पॉइंट देखील उभारण्यात आला आहे.

Kolhapur Lok Sabha Election Voting 2024 : कोल्हापूरमध्ये चुरशीची लढत

आज कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. जिल्ह्यातील अनेक दिग्गजांचे भवितव्य मतदारराजा ठरवणार आहे. कोल्हापुर येथील लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडून संजय मंडलिक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Kolhapur Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर - खिद्रापूर येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. अर्धवट पूलाच्या कामामुळे नागरिक नाराज होते. मात्र, येथील पुलाच्या कामाचे आश्वासन दिल्यावर आज खिद्रापूर मध्ये मतदान होणार आहे. गावकरी बहिष्कार घालणार नाही असे प्रशासनाने म्हटले आहे

Sangli Lok Sabha Election : सांगलीत तिंरगी लढत

सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील, महायुतीकडून विशाल पाटील यांच्यात लढत होणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनीही शड्डू ठोकल्याने ही लढत तिरंगी होईल.

Solapur : सोलापूरात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते दुरंगी लढत

सोलापूरात महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे आणि महायुतीकडून राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे. या मतदार संघाकडे राज्याच्या नजरा खिळून पडल्या आहेत.

 

 

 

Whats_app_banner