Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. विदर्भ मारठवड्यातील काही जिल्ह्यातील तापमान हे ४३ अंशांच्याही पुढे गेले आहे. हवामान विभागाने विदर्भात १० तारखे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विशेष करून विदर्भातील अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर नांदेड, लातूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट, वादळी वारे आणि पाऊस होण्याचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही पूर्व विदर्भ ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत जात आहे. त्यामुळे आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात आज हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्रात जळगाव येथे व दहा मे रोजी जळगाव, सोलापूर, अहमदनगर, पुणे येथे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात ६ व ७ तारखेला नांदेड व लातूर येथे मेघगर्जना, वीजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये आजपासून १० मे पर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, नागपूर, चंद्रपूर तसेच वर्धा येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आज पासून १० मे पर्यंत विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर सात तारखेला चंद्रपूर गडचिरोली व यवतमाळ येथे व आठ तारखेला वर्धा व नागपूर येथे तुरळक ठिकाणी मेघ गर्जना वीजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरात आज व उद्या आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस दुपारी किंवा संध्याकाळी आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
राज्यात विदर्भात बहुतांश जिल्ह्यात मोठ्या तापमानची नोंद झाली. अकोला येथे ४३.७ डिग्री सेल्सिअस, अमरावती येथे ४३.२ डिग्री सेल्सिअस, बुलढाणा येथे ३९.५ डिग्री सेल्सिअस, ब्रम्हपुरी येथे ४४.१ डिग्री सेल्सिअस, चंद्रपुर येथे ४३.६ डिग्री सेल्सिअस, गोंदिया येथे ४१.४डिग्री सेल्सिअस, नागपुर येथे ४३.५ डिग्री सेल्सिअस, वाशिम येथे ४३.४ डिग्री सेल्सिअस, वर्धा येथे ४३.५ डिग्री सेल्सिअस तर यवतमाळ येथे ४२.० डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात सोलापूर जिल्ह्यात आज पुन्हा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तापमान ४४.१ डिग्री सेल्सिअस ऐवढे नोंदवले गेले. तर उस्मानाबाद येथे ४२.७, संभाजीनगर येथे ४१.२, परभणी येथे ४२.६, नांदेड येथे ४२.६ तर बीड येथे ४३.२ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
संबंधित बातम्या