मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Viral Video: पुण्यात शेतीचा वाद टोकाला! पुतण्यावर रॉकेल ओतत हाती टेंभा घेऊन काकाचा जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Viral Video: पुण्यात शेतीचा वाद टोकाला! पुतण्यावर रॉकेल ओतत हाती टेंभा घेऊन काकाचा जीवे मारण्याचा प्रयत्न

Jan 09, 2023, 06:42 AM IST

    • Purandar Crime News : पुण्यातील पुरंदर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतजमीनिच्या वादातून एका काकाने आपल्या पुतण्याला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
Pune Viral Video:

Purandar Crime News : पुण्यातील पुरंदर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतजमीनिच्या वादातून एका काकाने आपल्या पुतण्याला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

    • Purandar Crime News : पुण्यातील पुरंदर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतजमीनिच्या वादातून एका काकाने आपल्या पुतण्याला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे : पुण्यातील पुरंदर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतजमीनिच्या वादातून एका काकाने आपल्या पुतण्याला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना वागदरवाडी येथे घडली असून याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

पुण्यातील शनिवार वाड्यातील काका मला वाचवा हा प्रसंग प्रसिद्ध आहे. मात्र, पुरंदर तालुक्यातील वागदारवाडीत एका पुटण्याने काका मला नका असे म्हणत जिवाच्या आकांताने पळत सुटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे.

वागदरवाडी येथील एका काका पुतण्याचे जमिनीवरून वाद आहे. काकाने अवैधरित्या जमिनीत उसाचे उत्पादन घेतले असून त्याची तोडणी सुरू होती. मात्र, ही बाब पुतण्याला रुचली नाही. यामुळे पुतण्या थेट जाब विचारायला शेतात गेला. पुतण्या आणि काही नातेवाईक शेतात शिरल्याने काकाची सटकली. त्याने थेट पुतण्यावर धावत जाऊन त्याच्यावर रॉकेल ओतले. यानंतर टेंभा पेटवून पुतण्याला जाळण्यासाठी त्याच्या मागे काका धावू लागला. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हातामध्ये पेटता टेंभा घेऊन काका आपल्याच पुतण्याच्या अंगावर धावत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी भास्कर त्र्यंबक भुजबळ असे आरोपी काकाचे नाव आहे. या प्रकरणी शारदा भुजबळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार जेजूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल संध्याकाळी घडली. शारदा भुजबळ यांच्या शेतात भास्कर भुजबळ यांनी न विचारता उसाचे पीक घेऊन उस तोड सुरू केली. यावरुण त्यांच्यामध्ये वाद होते. हे ऊस तोडणीचे काम थांबविण्याकरता फिर्यादी आणि तिचा मुलगा स्वप्नील असे गेले असता भास्कर भुजबळ यांनी स्वप्निलच्या अंगावर रॉकेल टाकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या झटपतीत स्वप्नील आणि त्याची आई जखमी झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पोलीस कोठडी दिली आहे.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हातामध्ये पेटता टेंभा घेऊन काका आपल्याच पुतण्याच्या अंगावर धावत असून याची चर्चा सोशल मीडियावर काल दिवसभर होती.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा