मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Koyta Gang : कोयता गॅंगविरोधात पुणे पोलिसांचा 'मास्टर प्लॅन'; गुन्हेगारांचा नायनाट करणार

Pune Koyta Gang : कोयता गॅंगविरोधात पुणे पोलिसांचा 'मास्टर प्लॅन'; गुन्हेगारांचा नायनाट करणार

Jan 08, 2023, 12:17 AM IST

    • Pune Koyta Gang : पुण्यात कोयता गॅंगने मोठी दहशत पसरवली आहे. या गॅंगविरोधात पुणे पोलिसांनी कंबर कसली असून कारवाई करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे.
Pune crime (HT_PRINT)

Pune Koyta Gang : पुण्यात कोयता गॅंगने मोठी दहशत पसरवली आहे. या गॅंगविरोधात पुणे पोलिसांनी कंबर कसली असून कारवाई करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे.

    • Pune Koyta Gang : पुण्यात कोयता गॅंगने मोठी दहशत पसरवली आहे. या गॅंगविरोधात पुणे पोलिसांनी कंबर कसली असून कारवाई करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे.

पुणे : पुण्यात कोयत्या गॅंगने धुमाकूळ घातला आहे. या कोयता गॅंगमुळे नागरिक दहशतीत आहेत. आज देखील खाऊ गल्लीत या गॅंगने दहशत माजवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे सुसंस्कृत पुण्याची ओळख आता गुन्हेगारीचे पुणे म्हणून होऊ लागली आहे. त्यामुळे या गॅंगवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाईसाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस दलातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकार्‍यांची पोलीस आयुक्तालयात आज बैठक झाली. या बैठकीत कोयता गॅंगला रोखण्यासाठी हा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. शहरातील अनेक मध्यवर्ती तसेच उपनगरात तरुणांकडून भरदिवसा कोयते उगारले जात आहेत.

या तरुणांमध्ये अनेक अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यामुळे सामान्य नागरिक तसेच व्यापारी दहशतीत असल्याने यावर पोलीस कारवाई कधी करणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता. त्यामुळे पोलिसांनी नव्या मास्टर प्लॅन अंतर्गत गुन्हेगारांवर वचक बसवली जाणार आहे. शहरात गुन्हेगारी वाढत असतांना ती नियंत्रीत करण्यासाठी मोक्का आणि सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या