मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune new parking policy : पुणेकरांसाठी नवी पार्किंग पॉलिसी; नो पार्किंगबाबत नवे आदेश

Pune new parking policy : पुणेकरांसाठी नवी पार्किंग पॉलिसी; नो पार्किंगबाबत नवे आदेश

Jan 07, 2023, 09:10 PM IST

    • Pune new parking policy : पुण्यात पार्किंग आणि नो पार्किंगसाठी नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.
Pune new parking policy

Pune new parking policy : पुण्यात पार्किंग आणि नो पार्किंगसाठी नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.

    • Pune new parking policy : पुण्यात पार्किंग आणि नो पार्किंगसाठी नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पुणे : पुण्यात वाहतूककोंडी आणि पार्किंग ही गंभीर समस्या बनली आहे. या वर तोडगा काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. त्यानुसार पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत चालण्याच्या अनुषंगाने पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त विजयकुमार मगर यांनी शहरातील पार्किंग, नो- पार्किंगसंबंधाने काही अंतिम आदेश तर काही तात्पुरते आदेश जारी केले आहेत. या नव्या आदेशामुळे आपली वाहने पार्क करतांना पुणेकरांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

Pune Hoarding Collapse : मुंबईनंतर पिंपरी चिंचवड शहरातही होर्डिंग कोसळलं, गाड्यांचं मोठं नुकसान

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन काही बाबतीत अंतिम आदेश जारी केले आहेत. त्यानुसार विमानतळ वाहतूक विभागांतर्गत विमाननगर लेन क्रमांक २ ते श्रीकृष्ण हॉटेल आणि दत्त मंदीर चौक ते अपसाउथ हॉटेल लेन (विमाननगर लेन क्रमांक २) दरम्यान नो- पार्किंग घोषित करण्यात आले आहे. तर हॉटेल सांबर लेनच्या सुरवातीपासून ते अपसाउथ हॉटेल तसेच दत्त मंदिर चौक ते कैलास सुपर मार्केट चौक आणि द्वारका गार्डन चौक ते संघर्ष चौकापर्यंत सुमारे २०० मीटर पर्यंत पी १ पी २ असलेले पार्किंग घोषित करण्यात आले आहे. हे आदेश अग्नीशमन, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी लागू नसतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तात्पुरत्या स्वरुपातील आदेशांवर हरकती व सूचना देण्याचे आवाहन

वाहतूक शाखेने विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत जिजामाता चौक ते फुटका बुरुज चौक तसेच फुटका बुरुज चौक ते वसंत दाते चौक या दरम्यान नो- पार्किंग घोषित करण्यात आल्याबाबतचे तात्पुरते आदेश जारी केले आहेत. त्याबाबत नागरिकांना काही हरकती व सूचना असल्यास पोलीस उप-आयुक्त वाहतुक शाखा, येरवाडा टपाल कचेरी, बंगला क्रमांक ६, पुणे येथे १७ जानेवारी २०२३ पर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या हरकती व सूचनांचा विचार करुन अंतिम आदेश जारी करण्यात येतील, असेही मगर यांनी कळविले आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या