मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

May 02, 2024, 11:32 AM IST

    • Mumbai Temperature: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातील तापमान सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Mumbai Temperature: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला आहे.

    • Mumbai Temperature: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला आहे.

Mumbai Weather Update 02 May 2024: वाढत्या उष्णतेमुळे मुंबईतील नागरिक हैराण झाले आहेत. तीव्र उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर जाताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मु्ंबईत काल (१ मे २०२४) कमाल तापमान ३४.२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवले गेले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी (२ मे २०२४) दिवसभर आकाश निरभ्र राहून किमान तापमान २५ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ८ किमी/प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. मुंबईत आर्द्रता ६१ टक्के आणि पर्जन्यमान १ टक्के राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत सूर्योदय सकाळी ६:१० वाजता होता आणि सूर्यास्ताचा अंदाज संध्याकाळी ०७:०१ वाजता होता.

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर! सीएसएमटी स्थानकाजवळ रेल्वेचा डबा घसरल्याने प्रवाशांचे झाले होते हाल!

पुढील काही दिवसात मुंबईच्या कमाल तापमानात कोणतेही लक्षणीय बदल होणार नाहीत. परंतु, त्यानंतर हळूहळू तापमान २-३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ४ मे रोजी उत्तर कोकणातील ठाणे आणि रायगड वेगळ्या भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर, ३ मे रोजी दक्षिण कोकणमधील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि ४ मे रोजी दक्षिण कोकण रत्नागिरी ध्येही अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे.

उन्हाळ्यात स्वत: काळजी कशी घ्यावी?

महाराष्ट्रासह देशभरात तीव्र उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तसेच पुढील काही दिवस कडक ऊन पडणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. उष्णता वाढल्याने आरोग्याविषयी समस्या देखील वाढू लागतात. यामुळे उन्हाळ्यात स्वत:ची काळजी कशी घ्यावी, हे जाणून घेऊयात.

- उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सन ग्लासेस आणि टोपीचा वापर करावा.

- उन्हापासून वाचण्यासाठी शक्यतो फिकट रंगाचे, सैल आणि सुती कपडे परिधान करा.

- आहारात पचायला हलक्या असतील अशा पदार्थांचा समावेश करावा आणि पाणी भरपूर प्यावे.

- टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, काकडी अशा फळांचे सेवन करा.

- नारळ पाणी, उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा, जेवणानंतर ताक ही घ्यावे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या