मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर! सीएसएमटी स्थानकाजवळ रेल्वेचा डबा घसरल्याने प्रवाशांचे झाले होते हाल!

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर! सीएसएमटी स्थानकाजवळ रेल्वेचा डबा घसरल्याने प्रवाशांचे झाले होते हाल!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 01, 2024 08:00 PM IST

CSMT-Wadala Harbour Train Services Disrupted: पनवेलहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलचा डबा रुळावरून खाली घसल्याने हार्बर मार्गावरील सेवा ठप्प झाली होती.

 पनवेलहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलचा डबा रुळावरून खाली घसल्याची घटना घडली.
पनवेलहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलचा डबा रुळावरून खाली घसल्याची घटना घडली.

Mumbai Local News: छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाजवळ (Chhatrapati Shivaji Terminus) सोमवारी (२९ एप्रिल २०२४) पनवेल- सीएसएमटी लोकल ट्रेनचा (Panvel- CSMT) डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली. या घटनेला आठवडा उलटला नाही, तोच पुन्हा एकदा पनवेलहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलचा डबा रुळावरून खाली घसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. यामुळे हार्बर मार्गावरील सेवा ठप्प झाली (CSMT-Wadala Harbour Train Services Disrupted) असून प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र, मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

ट्रेंडिंग न्यूज

Indian railway: पुणेकरांसाठी खुशखबर! प्रभू रामाच्या दर्शनासाठी पुणे ते अयोध्या धावणार समर स्पेशल ट्रेन्स, वाचा वेळापत्रक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनजवळील रेल्वे ट्रॅक एका आठवड्यात दुसऱ्यांदा रुळावरून घसरला. ज्यामुळे सीएसएमटी आणि वडाळा दरम्यान हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा विस्कळीत झाली. बुधवारी सायंकाळी ४.१५ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने प्रवाशांमध्ये खळबळ माजली.

Maharashtra Weather Update: मुंबई, पुणे, रायगडसह 'या' जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट! घराबाहेर पडतांना काळजी घ्या

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पनवेल- सीएसएमटी लोकल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाजवळ घसरली. त्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनजवळील पॉईंटवर त्वरीत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरूस्तीनंतर चाचणीदरम्यान पुन्हा त्याच ठिकाणी रिकाम्या लोकलचा डबा घसरला. यानंतर सीएसएमटी-वडाळा मार्गावरील उपनगरी सेवा तात्पपुरती स्थगित करण्यात आली. हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या तिकीटांसह पर्यायी मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी प्रगतीपथावर प्रयत्न सुरू होते.

आठवड्याभरातील दुसरी घटना

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास पनवेल- सीएसएमटी ट्रेनचा डबा घसरला. परिणामी, सीएसएमटी ते वडाळा दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली. सीएसएमटी स्थानकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्वच लोकल सेवा स्थगित करण्यात आल्या. लोकलचा वेग कमी असल्यामुळे कोणत्याही प्रवासाला दुखापत झाली नाही. महत्त्वाचे म्हणजे, हार्बर लाईन सेवेतील व्यत्ययामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. काही तासानंतर रेल्वे सेवा पुन्ह सुरळीत करण्यात आली.

IPL_Entry_Point

विभाग