Pune Bangalore Highway traffic jam : पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने होत आहे. गेल्या चार-पाच तासांपासून इथे ट्रॅफिक जॅम झाले आहे. दोन्ही बाजूंनी सुमारे १५ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यचा परिमाण या मार्गाच्या वाहतुकीवर झाला आहे. एकीकडे उन्हाच्या झळा त्यात वाहतूक कोंडीत अडकल्याने नागरिक बेजार झाले आहेत.
आज एक मे असल्याने अनेकांना सुट्ट्या आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी देखील सुरू आहे. या मुळे कराड येथील पुणे-बंगळुरू मार्ग परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. ही वाहतूक गेल्या तीन ते चार तासांपासून संथ गतीने सुरू आहे. अनेक मोठी वाहने या कोंडीत अडकून पडली आहे. तर काही प्रवासी गाड्या देखील यात अडकून पडल्या आहेत. परिमाणी या मार्गावरील वाहतूक ही संथ गतीने पुढे जात आहे.
पुणे-बंगळुरू हा राज्यातील सर्वात व्यस्त महामार्ग आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि मालाची वाहतूक होत असते. आज सकाळ पासून या मार्गावर वाहतूक ही हळू हळू पुढे जात आहे. बेशिस्त वाहने, नियम न पाळणारे चालक यामुले वाहतूक कोंडीत भर पडली आहे.
सुट्टी असल्याने अनेक नागरिक आज घराबाहेर पडले. काही चाकारमानी हे मुंबईहून कोल्हापूर, सातारा येथे जाण्यासाठी निघाले. मात्र, हे प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय झाली आहे. वाहतूक पोलिस सध्या येथील वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, गेल्या चार ते पाच तासांपासून या मार्गावरील वाहतूक कोंडी ही कायम आहे.
या मार्गावर वाहतूक कोंडीमुळे दोन्ही बाजूकडून तब्बल १५ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आज पुण्यात आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असतांना नागरिक या वाहतूक कोंडीत सापडल्याने त्यांची गैरसोय झाली आहे.
संबंधित बातम्या