मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

May 02, 2024, 02:57 PM IST

    • Yavatmal truck and tractor trailer Accident: यवतमाळमध्ये आयशर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या ट्रेलर यांच्यात भीषण धडक झाली.
यवतमाळ येथील रस्ता अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ जण जखमी झाले आहेत.

Yavatmal truck and tractor trailer Accident: यवतमाळमध्ये आयशर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या ट्रेलर यांच्यात भीषण धडक झाली.

    • Yavatmal truck and tractor trailer Accident: यवतमाळमध्ये आयशर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या ट्रेलर यांच्यात भीषण धडक झाली.

Yavatmal Accident News Today: यवतमाळ जिल्ह्यातील उमरी सायखेडा येथे आयशर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या ट्रेलरचा यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ जण जखमी झाली आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. याशिवाय, ट्रकमधील ७० शेळ्या देखील दगावल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. हा अपघात नेमका कशामुळे घडला? याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Dadar Traffic change: महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते ?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील उमरी सायखेडा येथे आज मालवाहू आयशर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या ट्रेलर यांच्यात भीषण धडक झाली. या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन जण जखमी झाले. याचबरोबर आयशर ट्रकमधील ७० शेळ्यांचाही मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी अर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच स्थानिकांच्या मदतीने आयशर ट्रकमधील जखमी बकऱ्यांना बाहेर काढले.

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर! सीएसएमटी स्थानकाजवळ रेल्वेचा डबा घसरल्याने प्रवाशांचे झाले होते हाल!

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, चालकाचा मृत्यू, ९ जण जखमी

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कार अपघात चालकाचा मृत्यू झाला आहे. तर, ९ जण जखमी झाले. मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूरजवळ हा अपघात झाला. दिलीप बर्वे (वय, ४८) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दिलीप बर्वे हे डोंबिवली येथील रहिवासी असल्यााची माहिती समोर येत आहे. तर जखमींमध्ये एका महिलेसह सहा महिन्याच्या बाळाचा समावेश आहे.

सुमन बर्वे (वय, ६८), अश्वजीत बर्वे (वय, १३), प्रणव बर्वे (वय, ५), आदेश बर्वे (वय, ३), अनिकेत बर्वे (वय १९), प्रिया बर्वे (वय १८ वर्ष), गौरव बर्वे (वय १७ वर्ष), कियारा बर्वे (वय ६ महिने) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर कामोठ्यातील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सुमन बर्वे यांची प्रकृती चिंताजनक आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या