मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Traffic Change : पुण्याच्या मध्यभागात वाहतूक व्यवस्थेत बदल; अंगारक चतुर्थीनिमित्त प्रशासणाचा निर्णय

Pune Traffic Change : पुण्याच्या मध्यभागात वाहतूक व्यवस्थेत बदल; अंगारक चतुर्थीनिमित्त प्रशासणाचा निर्णय

Jan 08, 2023, 04:48 PM IST

    • Pune Traffic Change due to angarki chaturthi 2023 : मंगळवारी (दि १०) या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी असून भाविकांची होणारी गर्दी पाहता, मध्य पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
Pune Traffic Change due to angarki chaturthi 2023

Pune Traffic Change due to angarki chaturthi 2023 : मंगळवारी (दि १०) या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी असून भाविकांची होणारी गर्दी पाहता, मध्य पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

    • Pune Traffic Change due to angarki chaturthi 2023 : मंगळवारी (दि १०) या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी असून भाविकांची होणारी गर्दी पाहता, मध्य पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

पुणे : नव्या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी ही मंगळवारी (दि १०) येणार आहे. या दिवशी मध्य पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मध्य पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी बदल केला आहे. नागरिकांची संभाव्य गर्दी पाहता, शिवाजी रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Dadar Traffic change: महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते ?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

अंगारक चतुर्थीनिमित्त शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. मंगळवारी येणारी चतुर्थी ही या वर्षातील पहिली असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवाजी रस्ता मंगळवारी वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

पूरम चौकातून बाजीराव रस्त्यावरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्ता, अलका चित्रपटगृह चौकमार्गे डेक्कन जिमखान्याकडे जावे. फर्ग्युसन रस्त्याने इच्छितस्थळी जावे. शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे) जंगली महाराज रस्त्याने खंडुजीबाबा चौक, टिळक चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी बाजीराव रस्त्याने सरळ जाऊन इच्छितस्थळी जावे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या