मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : काय सोनेरी दिवस होते ते... अजूनही आठवतात मला

Joke of the day : काय सोनेरी दिवस होते ते... अजूनही आठवतात मला

HT Marathi Desk HT Marathi

May 18, 2023, 11:01 AM IST

  • Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi jokes

Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

  • Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

ट्रेंडिंग न्यूज

Eye Care Tips: उष्णतेमुळे डोळ्यात जळजळ होते का? आराम मिळवण्यासाठी फॉलो करा हे उपाय

Joke of the day : दहा नारळांमधील सात नारळ नासले तर किती शिल्लक राहतील असं जेव्हा गुरुजी विचारतात…

Fitness Mantra: या व्यायामांनी तपासा तुमची फिटनेस लेव्हल, काही मिनिटांत कळेल किती फिट आहात तुम्ही

International No Diet Day: का साजरा केला जातो इंटरनॅशनल नो डाएट डे, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

 

शाळेत असताना गुरुजींची छडी हातावर पडल्यावर मी नेहमी माझ्या हाफ पँटला हात पुसून दुसरा हात पुढं करायचो... हाताला लागलेली छडीची घाण पुसायचो. कारण, मी साफसफाईच्या बाबतीत खूप जागरूक होतो!

...

मी शाळेत असताना माझे गुरुजी बर्‍याचदा माझ्या आई-वडिलांना घेऊन यायला सांगत , कारण direct मला काहीही सांगायला ते घाबरत असत...

...

मी जे काही लिहायचो ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असे. माझं हस्ताक्षरच तसं होतं. त्यामुळं अनेकदा ते मला एकच उत्तर दहा-दहा वेळा लिहून आणायला सांगत...

...

परीक्षेच्या वेळी मला जणू झेड सिक्युरिटी असायची. परीक्षा संपेपर्यंत तीन ते चार शिक्षक मला सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंचच्या आजूबाजूला उभे राहत...

...

कितीतरी वेळा मला बेंचवर उभं करून सन्मानित करण्यात येत असे, बाकीच्या मुलांनी माझ्याकडून प्रेरणा घ्यावी आणि मला वर्गातले सर्व विद्यार्थी व्यवस्थित दिसावेत हा मुख्य उद्देश असायचा शिक्षकांचा...

...

शिक्षकांना माझ्या तब्येतीची भलतीच काळजी होती. मला ड जीवनसत्व आणि मोकळी हवा मिळावी म्हणून सकाळी-सकाळी मला कोवळ्या उन्हात उभं केलं जाई आणि मैदानाला ५ फेर्‍या मारायला सांगितल्या जात.

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

विभाग