मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Liver Day 2024: साखरेचे सेवन आणि यकृताचे आजार यांचा एकमेकांशी नक्की कसा संबंध आहे?

World Liver Day 2024: साखरेचे सेवन आणि यकृताचे आजार यांचा एकमेकांशी नक्की कसा संबंध आहे?

Apr 19, 2024, 08:59 PM IST

    • Health Care: साखरेचे सेवन आणि यकृताचे आजार यांचा एकमेकांशी नक्की कसा संबंध येतो हे तज्ञांकडून जाणून घ्या
How exactly are sugar intake and liver disease related (freepik)

Health Care: साखरेचे सेवन आणि यकृताचे आजार यांचा एकमेकांशी नक्की कसा संबंध येतो हे तज्ञांकडून जाणून घ्या

    • Health Care: साखरेचे सेवन आणि यकृताचे आजार यांचा एकमेकांशी नक्की कसा संबंध येतो हे तज्ञांकडून जाणून घ्या

Sugar intake and liver disease relation: १९ एप्रिल रोजी पूर्ण जगभरात जागतिक लिवर डे साजरा केला जातो. वर्ल्ड हेल्थ ओर्गनायझेशन ने यकृताच्या आजारवर प्रकाश टाकण्यासाठी व त्यावर आणखी संशोधन करून सक्षम करण्यासाठी हा दिवस सुरू केला आहे. आज आपण सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल मुंबई चे डॉ. आकाश शुक्ला, (डायरेक्टर, हीपॅटोलॉजी) यांच्याकडून जाणून घेऊ की साखरेचे सेवन आणि यकृताचे आजार यांचा एकमेकांशी नक्की कसा संबंध येतो. जास्त साखर खाल्ल्याने आरोग्यावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांची तुम्हाला जाणीव असेल. 

ट्रेंडिंग न्यूज

Carrer Tips: एमबीए आणि पीजीडीएम लँडस्‍केपमधून नेव्हिगेट करताना कोणता मार्ग आहे सर्वोत्तम? जाणून घ्या

Melon Cooler: उन्हाळ्यात थंड ठेवेल मेलन कूलर, नोट करा शेफ रणवीरची ही टेस्टी रेसिपी

Cancer Risk: डोकं आणि मानेच्या कर्करोगाचे वाढत आहे प्रमाण, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Weight Loss Mistakes: रोजच्या या चुकांमुळे वाढू लागतं वजन, तुम्हीही करता का ही चूक?

Summer Diet: या गोष्टी कडक उन्हात पोटाला ठेवतात थंड, शरीरही राहते हेल्दी, जाणून घ्या यादी!

जास्त साखरेचे सेवन लठ्ठपणा, टाईप २ मधुमेह आणि हृदयविकार आणि काही कर्करोगांसह अनेक जुनाट आजारांच्या वाढीव जोखमीशी संबंधित आहे. दररोज साखर-गोड पेये प्यायल्याने यकृताचा कर्करोग आणि दीर्घकालीन यकृत रोग होण्याचा धोका देखील वाढू शकतो.

साखरेचे सेवन आणि यकृताचे आजार

कॉर्न सिरप किंवा फळे यांसारख्या गोड असणाऱ्या घटकांमध्ये आढळणाऱ्या सामान्य स्रोतांमधून मिळणारे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोन्ही स्वरूपात साखरेचा वापर जास्त प्रमाणात केल्यास यकृत खराब होऊ शकते कारण या साखरेचे कालांतराने यकृतातील चरबीमध्ये रूपांतर होते, ज्यामुळे फॅटी यकृत ज्यात यकृतमद्धे चरबीचे प्रमाण वाढते आणि यकृताच्या रोगाशी संबंधित चयापचय बिघडणे यासारख्या परिस्थितींमध्ये योगदान होते. हे चयापचय बिघडलेले कार्य केवळ यकृताच्या समस्यांनाच वाढवत नाही तर इन्सुलिन प्रतिरोध, मधुमेह, स्लीप एपनिया आणि हायपरडिस्लिपिडेमिया यांसारख्या संबंधित परिस्थिती विकसित होण्याचा धोका देखील वाढवते.

World Liver Day 2024: जागतिक यकृत दिन का साजरा करतात? जाणून घ्या इतिहास आणि महत्व!

यकृताचे आजार

जास्त साखरेचे सेवन केल्याने विविध प्रकारचे यकृताचे आजार होऊ शकतात, ज्यामध्ये फॅटी लिव्हर रोग सर्वात सामान्य आहे. तसेच हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी किंवा अल्कोहोल-संबंधित यकृत आजार सूद्धा होऊ शकतात.

World Liver Day 2024: तरुणांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या वाढतेय झपाट्याने, या पद्धतींनी रोखू शकतात!

वाढतोय यकृताच्या आजारांचा धोका

जागतिक स्तरावर यकृताचे आजार हे आरोग्यासाठी एक मोठे ओझे आहे. गेल्या दशकातील आकडेवारी पाहिल्यास भारतातही यकृताच्या आजारांचा धोका आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमध्ये वर्षानुवर्षे वाढ होत असल्याचे स्पष्ट होते. जीवनशैली आणि आहारातील गडबडीमुळे तरुण-तरुणीही यकृताच्या आजारांना बळी पडत आहेत, त्यामुळे आरोग्य क्षेत्रावर अतिरिक्त ताण तर वाढत आहेच, पण यकृताच्या आजारांमुळे मृत्यूच्या घटनाही वाढत आहेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

विभाग