Summer Health Care: कडक उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्यात फक्त बाह्यच नाही तर अंतर्गत शरीर थंड ठेवले पाहिजे. अनेकांना या उष्णेतेचे फार त्रास होतो. उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेच्या लाटेचा फटका बसतो. अतिउष्णतेमुळे शरीर थंड न राहिल्यास जुलाब, उलट्या, डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा कडक गरम वातावरणात आरोग्य बिघडू नये म्हणून काही थंडगार पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. हे थंड करणारे पदार्थ पोटाला तर थंड ठेवतातच पण शरीरालाही थंड ठेवतात. जेव्हा शरीर थंड राहते, तेव्हा ते कडक उन्हापासूनही सुरक्षित राहते. जाणून घ्या कोणते थंड करणारे पदार्थ आहेत जे उन्हाळ्यात आहाराचा भाग बनवता येतात.
> काकडी हा उत्तम पर्याय आहे. फायबर युक्त काकडीचा उन्हाळ्याच्या आहारात समावेश सहज करता येतो. काकडीचे सॅलड, ज्यूस, रायता असे तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच उन्हाळ्यात काकडी शरीराला थंड ठेवते.
> या सिजनमध्ये खूप नारळ पाणी प्यायला हवे. नारळाच्या पाण्यात अनेक फायदेशीर जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक घटक असतात जे शरीराला उष्णतेच्या लाटेपासून वाचवतात. नारळाचे पाणी उन्हाळ्यात रोज प्यायल्याने पोटाला थंडावा आणि शरीर हायड्रेट राहते.
> पुदिन्याच्या पानांचा आवर्जून उन्हाळ्यात समावेश करायला हवा. यामध्ये फोलेट, लोह, मँगनीज, फायबर आणि व्हिटॅमिन ए असते. पुदिन्याचे सेवन करताच शरीरात ताजेपणाची लहर वाहू लागते आणि ताजेतवाने वाटते. ही पाने कच्ची चघळता येतात, रायत्यात आणि पुदिना थंड पेयात घालता येतो.
> टरबूज हे उन्हाळ्यातील हंगामी फळ आहे. याचे सेवन केल्याने शरीराला मुबलक प्रमाणात हायड्रेशन मिळते. टरबूज हे अँटी-ऑक्सिडंट्सचाही चांगला स्रोत आहे आणि त्याचे थंड करणारे गुणधर्मही पोटासाठी खूप चांगले आहेत.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या