मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Liver Day 2024: तरुणांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या वाढतेय झपाट्याने, या पद्धतींनी रोखू शकतात!

World Liver Day 2024: तरुणांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या वाढतेय झपाट्याने, या पद्धतींनी रोखू शकतात!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Apr 19, 2024 09:51 AM IST

Health Care: जागतिक यकृत दिन दरवर्षी १९ एप्रिल रोजी साजरा केला जातो. यकृताशी संबंधित समस्यांपैकी फॅटी लिव्हर ही सर्वात सामान्य समस्या आहे, ज्यावर वेळेवर उपचार न केल्यास प्राणघातक ठरू शकते.

Fatty liver problem is increasing rapidly in youth
Fatty liver problem is increasing rapidly in youth (freepik)

Fatty Liver Cases Rising: यकृत हा फार महत्त्वाचा अवयव आहे. हा अवयव काम करणे बंद झाला तर फार मोठी समस्या होऊ शकते. जागतिक यकृत दिन दरवर्षी १९ एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवशी यकृताशी संबंधित आजार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यकृताशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) हा यकृताशी संबंधित आजारांपैकी सर्वात सामान्य आजार आहे, ज्यामुळे जगभरात लाखो लोक त्रस्त आहेत. या आजाराच्या रुग्णांमध्येही आधीच्या तुलनेत बरीच वाढ झाली आहे. एका अभ्यासानुसार, तरुणांमध्ये फॅटी लिव्हरच्या केसेस अधिक सामान्य आहेत. त्यामुळे फॅटी लिव्हरचे जोखीम घटक कोणते आहेत आणि ते कसे टाळता येऊ शकतात याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

फॅटी लिव्हरचे जोखीम घटक कोणते आहेत?

लठ्ठपणा

उच्च कोलेस्टरॉल

रक्तातील उच्च ट्रायग्लिसराइड पातळी

झोप श्वसनक्रिया बंद होणे

पीसीओएस (PCOS)

टाइप-२ मधुमेह

मेटाबॉलिक सिंड्रोम

दारू पिणे

हायपोथायरॉईडीझम

World Liver Day 2024: जागतिक यकृत दिन का साजरा करतात? जाणून घ्या इतिहास आणि महत्व!

कसा करायचा बचाव?

आरोग्यदायी आहार

प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त आहार किंवा जंक फूडचे जास्त प्रमाणत खात असाल तर तुम्हाला फॅटी लिव्हरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. याऐवजी तुम्ही हिरव्या भाज्या, फळे, दही, मासे, बीन्स, चिकन, अंडी इत्यादींचा आहारात समावेश करा. यासोबतच भरपूर पाणी पिणेही खूप गरजेचे आहे.

National Exercise Day 2024: राष्ट्रीय व्यायाम दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्व!

कोलेस्टेरॉलची पातळी

कोलेस्टेरॉलच्या पातळीची नियमित तपासणी करा आणि ते नियंत्रित करण्यासाठी निरोगी आहाराचे अनुसरण करा.

Skin Ageing: कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे वयाच्या आधीच तुम्ही म्हातारे दिसू लागता? जाणून घ्या

अल्कोहोल पिणे

अल्कोहोल पिण्यामुळे यकृताशी संबंधित अनेक गंभीर आजार होऊ शकतात, ज्यामध्ये फॅटी लिव्हर ते लिव्हर कॅन्सरचा समावेश होतो. त्यामुळे दारूचे सेवन करू नका. याव्यतिरिक्त, तंबाखू आणि त्यातील पदार्थ टाळणे देखील यकृतासाठी फायदेशीर ठरू शकते.

रक्तातील साखरेचे नियंत्रण गरजेचे

रक्तातील साखरेची पातळी वाढणे यकृतासाठी खूप धोकादायक ठरू शकते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel