मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Hair Fall: सावधान! उन्हाळ्यात या चुकांमुळे होतो हेअर फॉल

Summer Hair Fall: सावधान! उन्हाळ्यात या चुकांमुळे होतो हेअर फॉल

May 20, 2023, 08:35 PM IST

    • Hair Care in Summer: उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेक वेळा काही चुकांमुळे या काळात केस गळण्याचे प्रमाण वाढते. या चुका कोणत्या आहेत आणि त्या कशा टाळाव्या हे जाणून घ्या.
उन्हाळ्यात केस गळण्यासाठी कारणीभूत चुका

Hair Care in Summer: उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेक वेळा काही चुकांमुळे या काळात केस गळण्याचे प्रमाण वाढते. या चुका कोणत्या आहेत आणि त्या कशा टाळाव्या हे जाणून घ्या.

    • Hair Care in Summer: उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेक वेळा काही चुकांमुळे या काळात केस गळण्याचे प्रमाण वाढते. या चुका कोणत्या आहेत आणि त्या कशा टाळाव्या हे जाणून घ्या.

Common Mistakes of Hair Fall in Summer: तुम्ही हेअर केअर मध्ये कितीपण चांगले प्रोडक्ट वापरले तरी अनेक वेळा हेअर फॉल होतोच. आठवड्यातून दोन किंवा तीन पेक्षा जास्त वेळा शॅम्पू करणे, ड्राय शॅम्पू न वापरणे अशा कितीतरी चुकांमुळे हेअर फॉलोची समस्या होते. तुम्हाला जर केस गळतीपासून वाचायचं असेल तर आधी आपल्या सवयी बदलल्या पाहिजे. या चुकांमुळे केस गळती वाढते.

ट्रेंडिंग न्यूज

World Asthma Day 2024: वायू प्रदूषणामुळे वाढतोय दम्याचा त्रास, जाणून घ्या कसे करावे व्यवस्थापन

Parenting Tips: शिक्षण सुधारणांमध्ये सूक्ष्म-शालेय शिक्षणाची भूमिका काय आहे? जाणून घ्या

Summer Essentials: उन्हाळ्यात दिसायचे आहे कूल आणि स्टायलिश? तुमच्याजवळ नक्की ठेवा या ५ प्रकारचे ड्रेस

Mother's Day 2024: यावर्षी कधी आहे मदर्स डे? जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस

Ayurveda for Hair: या दोन आयुर्वेदिक हर्ब्सच्या मदतीने थांबवा केस गळती, मिळवा लांब स्ट्राँग हेअर

रोज शॅम्पू वापरणे

उन्हाळ्यात आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केसांना शॅम्पू केला पाहिजे. पण जर तुम्हाला तुमचे केस स्वच्छ दिसत असतील तर तुम्ही शॅम्पू करू नये. आठवड्यातून दोन किंवा तीन पेक्षा जास्त वेळ शॅम्पू करू नये. तुम्ही ड्राय शॅम्पू सुद्धा वापरू शकता. यामुळे तुमच्या केसातील एक्स्ट्रा ऑइल निघते.

ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवणे

केस धुतल्यानंतर लगेच केस विंचरू नये. बाहेर जायचे असल्यास केस पूर्णपणे वाळल्यानंतर जावे. किंवा केस वाळले नसतील केस झाकून तुम्ही जाऊ शकता. ओल्या केसांमध्ये चुकूनही कंगवा फिरवू नका.

ओल्या केसांना तेल लावणे

ज्या लोकांना नियमित तेल लावण्याची सवय असते ते अनेक वेळा ओल्या केसांना तेल लावतात. उन्हाळ्यात आर्द्रतेमुळए केसांना घाम येतो. ओल्या केसांना कधीही तेल लावू नये.

Hair Growth Tips: केसांच्या चांगल्या वाढीसाठी प्लॅस्टिक नाही तर वापरा लाकडाचा कंगवा, मिळतील आश्चर्यकारक फायदे

केसांना जोर लावून घासणे

बऱ्याच लोकांना केस धुतांना खूप घासायची सवय असते. यामुळे हेअर फॉलो होऊ शकतो. त्यामुळे असे करू नका. ओल्या केसांना टॉवेलने आरामात सुकवले पाहिजे. ओल्या केसांना जास्त घासल्याने किंवा झटकल्याने हेअर फॉल होऊ शकतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)