मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Ayurvedic Herbs To Control Hair Fall And Stop Premature White Hair

Ayurveda for Hair: या दोन आयुर्वेदिक हर्ब्सच्या मदतीने थांबवा केस गळती, मिळवा लांब स्ट्राँग हेअर

केसांसाठी आयुर्वेदिक टिप्स
केसांसाठी आयुर्वेदिक टिप्स
Hiral Shriram Gawande • HT Marathi
May 18, 2023 09:04 PM IST

Ayurvedic Herbs: जर तुम्हाला जास्त केस गळणे आणि वाढ खुंटल्याने त्रास होत असेल तर या आयुर्वेदिक औषधी वनस्पती तुमच्या केसांवर लावण्याचा प्रयत्न करा. काही दिवसातच फरक दिसून येईल.

Ayurvedic Remedies for Hair Fall: लांब आणि जाड केस ही प्रत्येक मुलीची इच्छा असते. पण अशा खूप कमी मुली आहेत ज्या त्यांच्या केसांमुळे आनंदी असतात. अनेकदा केस गळणे, कोरडे, निर्जीव आणि पातळ केसांची समस्या निर्माण होते. तुम्ही आतापर्यंत केस निरोगी आणि लांब करण्यासाठी अनेक प्रयत्न केले असतील. तर यावेळी आयुर्वेदात सांगितलेले हे हर्ब्स लावा. हे केसांची वाढ वाढवण्यास मदत करतील आणि केस लांब आणि कोरडे होण्यापासून रोखतील. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती.

ट्रेंडिंग न्यूज

Hair Growth Tips: केसांच्या चांगल्या वाढीसाठी प्लॅस्टिक नाही तर वापरा लाकडाचा कंगवा, मिळतील आश्चर्यकारक फायदे

भृंगराज आणि आवळा यांची पेस्ट लावा

आयुर्वेदात भृंगराज औषधी केसांसाठी खूप फायदेशीर मानली गेली आहे. ते केसांना लावल्याने केसांची वाढ होते आणि केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध होतो. तसेच केस सिल्की आणि सॉफ्ट होतात. आवळा पावडरमध्ये भृंगराज मिसळून लावा. पेस्ट बनवण्यासाठी आवळ्याच्या रसात दोन चमचे भृंगराज पावडर मिसळून पॅक बनवा. हा पॅक स्काल्पची मसाज करून खाली केसांच्या टोकापर्यंत लावा. हा पॅक केसांवर अर्धा तास राहू द्या. त्यानंतर कोणत्याही सौम्य शॅम्पूने केस धुवा.

Buttermilk for Hair: केस धुण्यासाठी अशा प्रकारे वापरा ताक, हेअर प्रॉब्लेमला करा सुट्टी

शिकेकाई आणि आवळ्याचे हेअर पॅक

जर तुम्हाला केस दाट करायचे असतील आणि ते पांढरे होण्यापासून रोखायचे असतील तर शिकेकाई आणि आवळ्याचा पॅक बनवून लावा. शिकेकाईचा हेअर पॅक रोज केसांना लावू नये हे लक्षात ठेवा. यामुळे केस तेलकट होऊ शकतात. आठवड्यातून एक किंवा दोनदा हा हेअर पॅक लावल्याने केसांची वाढ चांगली होते. हेअर पॅक बनवण्यासाठी शिककाईची पावडर बनवा. साधारण दीड चमचा शिकाकाई पावडर एक चमचा आवळा पावडरमध्ये मिक्स करा. कोमट पाण्याने पेस्ट तयार करा आणि मिक्सरमध्ये चांगले ब्लेंड करा. 

Remedies for Dandruff: डँड्रफपासून सुटका हवी? अशा प्रकारे केसांना लावा खोबरेल तेल

ही स्मूद पेस्ट केसांपासून टोकापर्यंत लावा आणि अर्धा तास राहू द्या. नंतर पाण्याने धुवा. यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग