मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Growth Tips: केसांच्या चांगल्या वाढीसाठी प्लॅस्टिक नाही तर वापरा लाकडाचा कंगवा, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Hair Growth Tips: केसांच्या चांगल्या वाढीसाठी प्लॅस्टिक नाही तर वापरा लाकडाचा कंगवा, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 16, 2023 02:47 PM IST

Wooden Comb: केस गळण्याची समस्या सामान्य आहे. याचे कारण प्लास्टिकचा कंगवा तर नाही? तुम्हाला तुमच्या केसांना हेल्दी आणि चमकदार बनवायचे असेल तर लाकडी कंगवा वापरा. जाणून घ्या लाकडी कंगव्याचे फायदे.

केसांसाठी लाकडी कंगव्याचे फायदे
केसांसाठी लाकडी कंगव्याचे फायदे

Benefits of Wodden Comb for Hair: तुम्ही सुद्धा केस गळतीमुळे त्रस्त आहात? ते तुमच्या प्लास्टिकच्या कंगव्यामुळे तर होत नाही ना? जर तुम्हाला तुमचे केस नेहमीसारखे निरोगी आणि चमकदार हवे असतील तर प्लास्टिकचा कंगवा सोडा आणि लाकडी कंगवा वापरणे सुरू करा. केसांच्या चांगल्या वाढीसाठी प्लॅस्टिकऐवजी लाकडी कंगवा का वापरावा हे जाणून घ्या.

Buttermilk for Hair: केस धुण्यासाठी अशा प्रकारे वापरा ताक, हेअर प्रॉब्लेमला करा सुट्टी

नैसर्गिक चमक

लाकडी कंगवा केसांचा गुंता सोडवतो आणि त्यांना नैसर्गिक चमक देतो. नैसर्गिक सामग्रीपासून बनविलेले, लाकडी कंगवामुळे ऍलर्जी किंवा त्वचेच्या कोणत्याही समस्या उद्भवण्याची शक्यता नाही. तर प्लास्टिकच्या कंगव्याचे हे तोटे आहेत.

स्काल्प ऑइल केसांना चांगल्या प्रकारे पोहचवते

लाकडी कंगवा स्काल्पचे नैसर्गिक तेल संपूर्ण केसांमध्ये सहजपणे वितरीत करू शकते. प्लॅस्टिकच्या कंगव्यामध्ये आधीच घाण साचलेली असते, ज्यामुळे केसांमध्ये इन्फेक्शन होऊ शकते.

Remedies for Dandruff: डँड्रफपासून सुटका हवी? अशा प्रकारे केसांना लावा खोबरेल तेल

केसांची वाढ

प्लास्टिकच्या कंगव्यापेक्षा लाकडी कंगव्याचा वापर जास्त केल्याने केसांची वाढ चांगली झाल्याचे दिसून येते. त्यामुळे केसांच्या मुळांना मसाज होते आणि त्यामुळे केस दाट आणि मजबूत होतात. तर प्लॅस्टिकच्या कंगव्यामुळे स्ट्रोकच्या शेवटी गुंता तयार होऊन ते तूटतात.

कोंडा कमी होतो

स्काल्पच्या कोरडेपणामुळे डोक्यावर खाज सुटणे आणि कोंड्याची समस्या उद्भवते. डोक्यातील कोंडा फक्त केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवण्यापासून रोखत नाही तर त्यांना कमकुवत देखील बनवतो. पण लाकडी कंगव्याचे मऊ, गोलाकार दात स्काल्पला आराम देतात आणि केसांमध्ये घाण जमा होण्यापासून रोखतात. त्यामुळे कोंडा होण्याची शक्यता कमी होते. दुसरीकडे, प्लास्टिकचा कंगवा वापरताना, प्लास्टिक चार्जमुळे घाण देखील केसांना चिकटते.

 

उत्तम ब्लड सर्कुलेशन

कार्बन बेस्ड असल्याने लाकडी कंगवा त्वचेला स्क्रॅच किंवा इजा न करता स्काल्पची मालिश करतो. त्यामुळे डोक्यातील ब्लड सर्कुलेशन चांगले राहून मन शांत राहते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग